
सांगुळवाडी महाविद्यालयात ५ ऑगस्टपासून ‘मयुरपंख’
सांगुळवाडी महाविद्यालयात
५ ऑगस्टपासून ‘मयुरपंख’
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २७ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत घेण्यात येणारा आंतरमहाविद्यालीन सांस्कृतिक युवा महोत्सव मयुरपंख येथील सांगुळवाडी महाविद्यालयात रंगणार आहे. ५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात कोकणातील २८ महाविद्यालयातील १ हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी या महोत्सवाचे यजमानपद येथील सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाला मिळाले आहे. या महोत्सवात कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या २८ महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. महोत्सवाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. यामध्ये शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, समूह गायन, ताल वाद्य, शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, प्रश्नमंजुषा, भाषण, वादविवाद स्पर्धा, नाटक, मूकनाट्य, नक्कल, मूकाअभिनय, चित्रकला, मातीकाम, व्यंगचित्र, रांगोळी, छायाचित्रे आदी स्पर्धांचा समावेश आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी सांगुळवाडी महाविद्यालयात सुरू आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81425 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..