संकटांना जिद्दीने सामोरे जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संकटांना जिद्दीने सामोरे जा
संकटांना जिद्दीने सामोरे जा

संकटांना जिद्दीने सामोरे जा

sakal_logo
By

39024
वेंगुर्ले ः गुणवंतांना गौरविताना माजी आमदार शंकर कांबळी, संजय पडते, प्रकाश गडेकर, यशवंत परब, सुनील डुबळे आदी.

संकटांना जिद्दीने सामोरे जा

शंकर कांबळी ः वेंगुर्लेत शिवसेनेतर्फे गुणवंत गौरव

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना खूप आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी ध्येयापासून विचलित होता नये. जीवनातील संकटांना जिद्दीने सामोरे गेल्यास भविष्यात नक्कीच यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन माजी आमदार शंकर कांबळी यांनी येथे केले.
वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले तालुक्यातील दहावी-बारावीतील ११६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्री. कांबळी बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, आडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, बाळा दळवी, तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, महिला शहर संघटिका मंजुषा आरोलकर, माजी नगरसेवक तुषार सापळे, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, शहर समन्वयक विवेकानंद आरोलकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, नीलेश चमणकर, मनोहर येरम, उमेश नाईक, नंदकुमार घाटे, डेलीन डिसोजा, नेहा साळगावकर, शीतल साळगावकर, होडावडा उपसरपंच अनन्या धावडे, तुकाराम परब आदींसह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संजय पडते यांनी, सर्वसामान्य मराठी माणसाला मुंबईमध्ये बँकेत, एअर इंडिया व अनेक क्षेत्रांत नोकरी मिळावी यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून मोठा लढा उभारला होता. शिवसेनेने कधीही सत्तेचा हाव न धरता ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण केल्याचे सांगितले.
-----
ठाकरेंमुळे जिल्ह्यात मेडिकल कॉलेज
जिल्ह्यासाठी उद्धव ठाकरे यांनी १६६ कोटीचे मेडिकल कॉलेज मंजूर केले असून त्याचे काम सुरू आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. यासाठी ‘शिकेल तोच टिकेल’ हे लक्षात ठेवून वाटचाल करा, असे सांगितले. यावेळी शैलेश परब यांनीही मार्गदर्शन केले. यशवंत परब यांनी सूत्रसंचालन केले. आनंद दाभोलकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81443 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top