अमली पदार्थांविराधात कुडाळात समुपदेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमली पदार्थांविराधात कुडाळात समुपदेशन
अमली पदार्थांविराधात कुडाळात समुपदेशन

अमली पदार्थांविराधात कुडाळात समुपदेशन

sakal_logo
By

39030
कुडाळ ः येथे अमली पदार्थ व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे केलेले आयोजन.

अमली पदार्थांविराधात
कुडाळात समुपदेशन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळ येथे अमली पदार्थ व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गतर्फे आज आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्राचे आयोजन केले होते. जिल्हा रुग्णालयाचे किरण दासराव कनकुटे (सायकॉलॉजिस्ट) व कारमिस आल्मेडा (समुपदेशक) तसेच गायत्री कुडाळकर (समुपदेशक) कुडाळ यांनी विद्यार्थी तसेच शिक्षक वर्गाचे अमली पदार्थ तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ यापासून व्यसनमुक्त कसे व्हावे, याविषयी समुपदेशन केले. कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शालिनी शेवळे व उपप्राचार्य राजकिशोर हावळ यांनी विद्यार्थी व शिक्षक वर्गांचे समुपदेशन केल्याबद्दल जिल्हा रुग्णालय टीमचे आभार व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81454 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top