''सतीश कथामाला'' उपक्रमाचे तळेरे महाविद्यालयात उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''सतीश कथामाला'' उपक्रमाचे तळेरे महाविद्यालयात उद्घाटन
''सतीश कथामाला'' उपक्रमाचे तळेरे महाविद्यालयात उद्घाटन

''सतीश कथामाला'' उपक्रमाचे तळेरे महाविद्यालयात उद्घाटन

sakal_logo
By

swt287.jpg
39092
तळेरे ः ''सतीश कथामाला'' उपक्रमात बोलताना शशांक तळेकर. (छायाचित्र ः एन. पावसकर)

‘सतीश कथामाला’ उपक्रमाचे
तळेरे महाविद्यालयात उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २८ः येथील मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालय व एनसीसी विभागाच्या वतीने ''सतीश कथामाला'' या वीर हुतात्मांच्या जीवनावर आधारित आंतरविभागीय महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळेरेचे माजी सरपंच शशांक तळेकर, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे समन्वयक श्रीपाद वेलिंग उपस्थित होते.
देशासाठी आपल्या सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी, थोर हुतात्म्यांच्या विस्मरणात गेलेल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी विनायक दळवी यांनी ही नावीन्यपूर्ण संकल्पना महाविद्यालयात रुजविली. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली. सहाय्यक प्राध्यापक हेमंत महाडिक यांनी स्वागत केले. थोर हुतात्म्यांच्या आठवणी या कथामालेतून जागृत होतील, असे ते म्हणाले. शशांक तळेकर यांनी विचार व्यक्त करताना, हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्य़ांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महाविद्यालयाचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी कथामालेतून ''घर घर तिरंगा'' योजनेचे महत्त्व सांगून घरोघरी तिरंगा फडकावला पाहिजे, असे श्री. वेलिंग म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली महाजन हिने, आभार दीप्ती वारीक हिने मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81578 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top