
शिवसेनेतर्फे कोलगावात शैक्षणिक साहित्य वाटप
swt286.jpg
39091
कोलगाव ः येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपावेळी अपर्णा कोठावळे, शिवदत्त घोगळे आदी.
शिवसेनेतर्फे कोलगावात
शैक्षणिक साहित्य वाटप
सावंतवाडी, ता. २८ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोलगाव शाळा क्रमांक ३ येथे कोलगाव शिवसेनेकडून महिला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांच्या सहकार्याने मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी महिला तालुका प्रमुख कोठावळे, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य शिवदत्त घोगळे, माजी सरपंच तथा महिला उपतालुका प्रमुख मारिया डिमेलो, उपविभाग प्रमुख तथा माजी सरपंच संदीप गवस, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा करमळकर, प्रशांत कोठावळे आदी उपस्थित होते. ह्यावेळी बोलताना कोठावळे यांनी विद्यार्थ्यांना बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे तसेच शिवसेनेच्या कार्याची माहिती दिली. घोगळे, गवस यांनीही मार्गदर्शन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81584 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..