
सदर ः मासे विक्री व्यवस्थापन
२२ जुलै टु ४ वर सदर आहे
...............
आधुनिक मत्स्यपुराण----लोगो
...............
-rat२८p१५.jpg ः प्रा. डॉ. केतन चौधरी
-----------------
इंट्रो
मत्स्य व्यवसायामध्ये पणन व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. मासा नाशवंत पदार्थ असल्याने चांगली, कार्यक्षम आणि न्याय्य पणनव्यवस्था असणे आवश्यक असते. मत्स्य व्यवसायात पणनव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, साठवणूक व्यवस्था, प्रक्रिया कारखाने हे सर्व खासगी संस्थांमार्फत केले जाते. सहकारी संस्था आणि शासकीय संस्थांमार्फत नगण्य पणन व्यवस्थापन केले जाते. मत्स्य व्यवसायातील पणन व्यवस्थापन अभ्यासायचे असल्यास ते मत्स्य पदार्थ उत्पादन, मत्स्य पदार्थ वापर, पदार्थ वितरण, मत्स्य पणन साखळी व पणन कड्या, उत्पादकाचा (मासेमार किंवा मत्स्य शेतकरी) ग्राहकाच्या (मासे खाणारे) किमतीतील हिस्सा किती आहे, याप्रमाणे अभ्यासला पाहिजे.
--------
मासे विक्री व्यवस्थापन
मत्स्योत्पादन व उत्पाद (पदार्थ) काय आहे, तो कधी उत्पादित होणार आहे, किती प्रमाणात उत्पादित होणार, मासळीच्या ग्राहकाच्या आवड-निवडीप्रमाणे उत्पादन होणार आहे की उत्पादन जो घेणार आहे त्याच्या सोयीप्रमाणे उत्पादन होणार आहे, पदार्थ उत्पादित होण्याकरिता किती खर्च येणार आहे, पदार्थ विक्रीपश्चात मिळणारी किंमत किती आहे, पदार्थाचा दर्जा काय असणार आहे, पदार्थाचा आकार व वजन किती, ग्राहकाच्या मागणीप्रमाणे आहे का, पदार्थाची काढणी कशी करणार, शास्त्रीय पद्धत कोणती, प्रक्रिया करणार असल्यास खर्चात किती वाढ होते, वाढीव खर्चाच्या त्यामानाने किंमत वाढवून मिळते आहे का, संवर्धित मासळी कोठे विक्री करणार, त्याचा काय वापर होईल, स्थानिक बाजारपेठत विक्री की परदेशी बाजारपेठेत विक्री, स्थानिक बाजारपेठेतील ग्राहक वैयक्तिक की संस्था (हॉटेल, होस्टेल, प्रक्रिया कारखाने), निर्यात करणार असल्यास कोणत्या देशात निर्यात, त्या देशातील मागणी काय, आयात करण्याचे देशाचे नियम काय आहेत, या सर्व बाबींचा विस्तृत अभ्यास करून सध्या असे विक्री व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींसोबत चर्चा आणि शंका निरसन करणे आवश्यक असते.
*बाजारपेठेतील मध्यस्थ ः मासा हा अती जलद नाशवंत पदार्थ असल्याने मासळीच्या वितरणात मध्यस्थाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. मासळी बाजारपेठेत सुमारे सहा प्रकारचे मध्यस्थ आढळतात ः लिलाव करणारे , कमिशन एजंट (खरेदी), होलसेलर, कमिशन एजंट (विक्री), घाऊक खरेदी-विक्री करणारे, फिरते विक्रेते.
*मध्यस्थांची आवश्यकता आहे का?
उत्पादकाला सर्वात जास्त फायदा झाला पाहिजे, हे बाजारपेठ अर्थशास्त्राचे मुलभूत तत्त्व आहे. असा फायदा सर्वात जास्त उत्पादक -ग्राहक या शून्य मध्यस्थ साखळीत होतो; परंतु बऱ्याचदा उत्पादकच मध्यस्थांची नेमणूक करतात. कारण, उत्पादकाकडे विक्रीकौशल्य, विक्रीक्षमता, वाहतूक व साठवणूक क्षमता या बाबींचा अभाव असतो. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे मध्यस्थ असण्यास हरकत नाही; पण त्याने माल वितरण कार्यक्षमता वाढवली पाहिजे तसेच मूळ उत्पादकाला मिळणारा हिस्सा अन्यायकारक असता कामा नये.
*पणन साखळी व तिचा किमतीवर होणारा परिणाम ः पणन साखळी जेवढी लांब तेवढी ग्राहकाला त्या मासळीकरिता जास्त किंमत द्यावी लागते तसेच मच्छीमाराला ग्राहकाच्या किमतीतील हिस्सा (वाटा) कमी मिळतो. स्थानिक बाजारपेठेत मासळी विक्री केल्यास तिथे पणन साखळी लहान असते. लांबच्या बाजारपेठेत हीच पणन साखळी मात्र लांब (मोठी) होते. स्थानिक बाजारपेठेत कमी किमतीचे मासे विकले जातात तर दूरच्या तसेच शहरातील मोठ्या बाजारपेठेत ज्या मासळीला चांगली किंमत मिळते, ते मासे विकले जातात. कारण, वाहतुकीची किंमत, पॅकिंगची किंमत प्रतिकिलो वजनाप्रमाणे आकारली जाते.
मच्छीमाराला ग्राहकाच्या किमतीतील सर्वात जास्त हिस्सा (रुपयाच्या स्वरूपात) शून्य कडी साखळीत मिळतो (८०.६ टक्के). मच्छीमाराला ग्राहकाच्या किमतीतील सर्वात कमी हिस्सा (रुपयाच्या स्वरूपात) चार कडी साखळीत मिळतो (२७.९ टक्के). ग्राहकाला वाजवी दरात दर्जेदार मासे प्राप्त होण्याकरिता तसेच मच्छीमाराला ग्राहकांच्या किमतीतील सर्वात जास्त हिस्सा प्राप्त होण्याकरिता पणन साखळीतील कड्याची संख्या कमी असणे महत्वाचे आहे.
- प्रा. डॉ. केतन चौधरी,
प्राध्यापक आणि विभागप्रमुख,
मत्स्यसंपत्ती अर्थशास्त्र आणि विस्तार शिक्षणविभाग
मत्स्य महाविद्यालय,शिरगाव, रत्नागिरी
--------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81623 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..