चिपळूण ः चिपळुणात दिग्गजांचे पत्ते कट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः चिपळुणात दिग्गजांचे पत्ते कट
चिपळूण ः चिपळुणात दिग्गजांचे पत्ते कट

चिपळूण ः चिपळुणात दिग्गजांचे पत्ते कट

sakal_logo
By

पंचायत समिती निवडणूक आरक्षणः लोगो
...
ratchl२८१.jpg
३९११०
ः चिपळूण ः पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आलेली आरक्षण सोडत.
---------------
गणातून पत्ता साफ; दिग्गजांचा भ्रमनिरास

चिपळुणात इच्छुकही हिरमुसले; खेर्डी, शिरगाव, वाघिवरेत ओबीसी महिला; पेढे अनुसूचित जातीसाठी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः येथील पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षणात तालुक्यातील अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले आहेत. नेहमी चर्चेत असलेल्या खेर्डी, शिरगाव, वाघिवरे गण ओबीसी महिलांसाठी राखीव झाला तर पेढे गण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. नव्याने वाढलेला वहाळ आणि मूर्तवडे गण सर्वसाधारण गटासाठी राखीव झाला आहे.
चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. या वेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, गटविकास अधिकारी उमा घार्गे - पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी भास्कर कांबळे यांच्यासह महसूलचे अधिकारी व राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यात राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असलेला खेर्डी, शिरगांव, वाघिवरे गण नागरिकांचा मागस प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाला आहे. या तिन्ही गणातील विद्यमान सदस्यांचा पंचायत समितीसाठीचा पत्ता कट झाला आहे. शिरळ, कुटरे, भोम, दळवटणे, कापसाळ, वहाळ, मुर्तवडे हे सात गण सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव झाले आहेत. पेढे गण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. गतवर्षी कापसाळ गण अनुसूचित जाती महिलांसाठी प्रथमच राखीव झाला होता. पिंपळी खुर्द, अलोरे, पिंपळी बुंद्रुक, सावर्डे, निवळी, कोंडमळा आणि कोकरे हे सात गण सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहेत.
...
चौकट
राजकीय पक्षांची कसरत होणार
पेढे गण आणि गट गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. यातील पेढे गण अनुसूचित जातीसाठी राखीव तर दळवटणे गण सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव झाल्याने तयारी केलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला. येथे लोकांशी संपर्क असलेला उमेदवार शोधताना राजकीय पक्षांची कसरत होणार आहे.
...
चौकट
कुटरे गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव
कुटरे गणात अनेकांनी पंचायत समितीची तयारी केली होती; मात्र हा गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचाही हिरमोड झाला आहे. विद्यमान सदस्यांपैकी अनेकजण पुन्हा पंचायत समितीची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नव्हते. काही सदस्यांची मदार जिल्हा परिषद निवडणूक आरक्षणावर होती. त्यामुळे जिल्हा परिषद आरक्षणावर त्यांची नजर आहे.
---------
चौकट
ठसाळे, साळवी, शिर्केंची संधी हुकली
सावर्डे गणात गतवर्षी राष्ट्रवादीच्या पूजा निकम विजयी झाल्या होत्या. या वेळेस हा गण पुन्हा सर्वसाधारणसाठी आरक्षित असल्याने त्यांना संधी आहे. खेर्डी गणाचे मावळते सदस्य नितीन ठसाळे, पोफळी गणाचे बाबू साळवी यांनी स्वतःच्या गणातील संधी हुकली आहे. गतवेळच्या चिवेली गणाचे सदस्य नंदकुमार शिर्के सलग दोनवेळा विजयी झाले होते. आता मात्र नव्याने निर्माण झालेल्या वाघिवरे गणात नामाप्र महिला राखीव झाल्याने त्यांचाही पत्ता कट झाला आहे.
---------
चौकट
चिपळूण तालुक्यातील आरक्षित गण
* अनुसूचित जाती (महिला) ः पेढे
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ः शिरगांव, खेर्डी, वाघिवरे,
* नागरिकांचा मागास प्रवर्ग ः दहिवली बुद्रुक, उमरोली
* सर्वसाधारण महिला ः भोम, शिरळ,दळवटणे, कापसाळ, वहाळ, मुर्तवडे, कुटरे
* सर्वसाधारण ः पिंपळी खुर्द, अलोरे, पिंपळी बुद्रूक, सावर्डे, निवळी, कोंडमळा, कोकरे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81632 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top