चिपळूण ः रत्नागिरी जिल्ह्यातच वर्षा पर्यटनाला बंदी का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः रत्नागिरी जिल्ह्यातच वर्षा पर्यटनाला बंदी का?
चिपळूण ः रत्नागिरी जिल्ह्यातच वर्षा पर्यटनाला बंदी का?

चिपळूण ः रत्नागिरी जिल्ह्यातच वर्षा पर्यटनाला बंदी का?

sakal_logo
By

-rat२८p१८.jpg-
39139
चिपळूण ः कडेकपारीतून वाहत येणारे असे प्रपात पर्यटकांना आकर्षित करतात.
------
रत्नागिरीत वर्षा पर्यटनावर बंदी; शेजारील जिल्ह्यांना संधी


रत्नागिरीतच निर्णय; व्यवसायावरही परिणाम, अर्थकारणालाच खीळ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता.२८ ः रत्नागिरी जिल्ह्यातील वर्षा पर्यटनावर बंदी घातली जात आहे. शेजारील जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी आमंत्रण दिले जात असताना मात्र फक्त रत्नागिरी जिल्ह्यातीलच वर्षा पर्यटन बंद का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
कोकणचा पावसाळा अनेकांना आवडीचा आहे. अलिकडच्या काही दिवसांत वर्षा पर्यटनासाठी कोकणात येणाऱ्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. सर्वत्र दिसणारी हिरवळ, हिरवीगार झाडे, झोडपणारा पाऊस आणि नदीनाल्यांची खळखळ शिवाय कोसळणारे धबधबे हे अनेकांना आकर्षित करत असतात. हिवाळा आणि उन्हाळ्यात कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षून घेत असतात; मात्र, अलिकडच्या काही दिवसांत पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्‍या लोकांची संख्या वाढती आहे. कोकणात येण्यासाठी असलेले नागामोडी घाट हे देखील आकर्षण आहे; मात्र, अशाचवेळी प्रशासनाकडून गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील वर्षा पर्यटनावर सर्रासपणे बंदी घातली जाते. वर्षा पर्यटनासाठी काही निर्बंध लावणे जरूरीचे असताना सरसकट ठिकाणी बंदीच केली जाते. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. वर्षा पर्यटनातून कोकणात आर्थिक उत्पन्न निर्माण होऊ शकते; मात्र, ते या बंदीमुळे ठप्प होत आहे. फक्त रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास केवळ जिल्ह्यातीलच वर्षा पर्यटनस्थळावर प्रशासनाकडून बंदी घालण्यात येत आहे. संबंधित तहसीलदार, जलसंपदा विभाग, ग्रामपंचायत यांच्याकडून ही लागू करण्यात आलेली बंदी बेकायदेशीर आहे. रघुवीर घाटावर दरवर्षी वर्षा सहलीसाठी मोठी गर्दी असते; मात्र, यावर्षी सरसकट बंदी घातल्याने हा मार्गच बंद केल्याने निसर्गाचा आस्वाद घ्यायचा कसा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
-------------------
कोट
बंदीपेक्षा निर्बंध घालणे जरूरीचे आहे. म्हणजेच कोकणात वर्षा पर्यटन अधिक बहरेल आणि अर्थव्यवस्थेला देखील गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे; मात्र, प्रशासन सरसकट बंदी घालत असल्याने तीव्र नाराजी आहे.
- अमरदीप फडतरे, गुहागर.
-------------
कोट
आता श्रावण महिना सुरू होत आहे. हा काळ वर्षा पर्यटनासाठी महत्त्वाचा असतो. नागेश्वरी, मार्लेश्वर येथेही पर्यटक पावसाळ्यात येत असतात. आवश्यक ती खबरदारी घेऊन आणि निर्बंध घालून अशी ठिकाणे पर्यटकांसाठी खुली करावीत.
-अविनाश पाटील, चिपळूण
..
चौकट
सिंधुदुर्ग, रायगड, साताऱ्यात निमंत्रण..
लगतचा सिंधुदुर्ग, रायगड, सातारा या जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांना निमंत्रणच दिले जात आहे. त्या त्या ठिकाणचे पर्यटन महामंडळाचे अधिकारी वर्षा पर्यटनासाठी या, असे सांगून अशा स्थळांची प्रसिद्धीच करत आहेत; परंतु रत्नागिरी जिल्ह्यात अशा ठिकाणांवर बंदी घालून येथील अर्थकारणालाच खीळ घातली जात आहे. या वर्षीचा विचार केल्यास रघुवीर घाट, सवतसडा या बरोबरच ठिकठिकाणचे धबधबे, धरण परिसर अशा महत्त्वाच्या वर्षा पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. याशिवाय तेथील छोट्या व्यावसायिकांवरदेखील परिणाम झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81640 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..