मंडणगड- रानातील अळंबी ठरतेय रोजगाराचे साधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड- रानातील अळंबी ठरतेय रोजगाराचे साधन
मंडणगड- रानातील अळंबी ठरतेय रोजगाराचे साधन

मंडणगड- रानातील अळंबी ठरतेय रोजगाराचे साधन

sakal_logo
By

rat28p12.jpg
39373
मंडणगडः बसस्थानक परिसरात अळंबी विक्री करताना आदिवासी महिला.
-----------
रानात अळंबी उगवण; बनले रोजगाराचे साधन
विक्रीतून आर्थिक फायदा; दिवसाला दीड ते दोन हजार उत्पन्न
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २९ः ऊन-पाऊस होत असल्याने दोन दिवसांपासून रानात डोंगरमाथ्यावर, झाडाझुडपातून अळंबीची उगवण झाली आहे. पहाटे त्यांचा शोध घेऊन आदिवासी व स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या विक्रीतून रोजगाराचा मार्ग शोधला असून ते आर्थिक उत्पन्नाचे साधन ठरत आहे.
नैसर्गिक उत्पादित होणाऱ्या अळंबी व रानभाज्या या चविष्ट आणि स्वादिष्ट असल्याने त्याला शहरात मोठी मागणी असून त्यांच्या विक्रीतून आर्थिक लाभ मिळतो आहे.मोठा पाऊस झाला की, रानात अळंबी जमिनीतून वर उगवते. ती शोधून काढणे कसबीचे काम असते. या वेळी पावसाचा जोर ओसरल्याने अळंबी फुटली नाही; मात्र दोन दिवसांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अळंबीची उगवण झाली आहे. तालुक्यात रोजगाराच्यानिमित्ताने आदिवासी समाजातील अनेक कुटुंबे रानातील डोंगर पठारावर झोपड्या बांधून राहत आहेत. पहाटे लवकर जंगलात जाऊन त्याचा शोध घेण्यात येतो. गवताचे प्रमाण व उंची वाढल्याने त्यातून अळंबीच्या कळ्या शोधून काढाव्या लागत आहेत; मात्र माहितगार बरोबर शोध घेऊन त्या काढून घेत आहेत. स्थानिक शेतकरीही या कामी पुढे आहेत. दोन तासांत टोपलीभर अळंबी जमा करून त्याची मुख्य रस्त्याशेजारी, शहरातील बाजारपेठेत विक्री करण्यात येत आहे तसेच तालुक्यातील प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी अळंबी विक्री होताना दिसून येत आहे. 100 ते 150 रूपयांना वाटा लावून आदिवासी महिला त्याची विक्री करताना दिसून येत आहेत. मंडणगड बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अळंबीची विक्री होत असून खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. तास दोन तासात आणलेल्या अळंबीची विक्री होऊन त्यातून हजार ते दीड हजार रूपयांचे उत्पन्न पदरी पडत आहे. रानात उगवणाऱ्या नैसर्गिक भाज्यांना चांगली मागणी असून नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.
----------
चौकट
पावसाळी रानात उगवणाऱ्या रानभाज्या
भारगी, टाकला, कालेरी, धांडगी, पोकला, मयाळू, तेरी, काटल अशा पावसातील रानटी भाज्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे खवय्यांना विविध भाज्यांचा स्वाद चाखायला मिळतो आहे. तसेच या नैसर्गिक फुलणाऱ्या भाज्यांना चांगली मागणी असल्याने त्यातून आर्थिक फायदाही होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81711 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top