
चिपळूण ः श्रावणच्या तोंडावर केळी महाग
श्रावणच्या तोंडावर फळे महागली
चिपळूण, ता. २९ः श्रावण सुरू होण्याआधीच केळीचे भाव अचानक तेजीत आले आहेत. श्रावणच्या तोंडावर केळीची आवक कमी झाल्याने ही भाववाढ झाली आहे.
चिपळूण तालुक्यात जळगावसह पश्चिम महाराष्ट्रातून केळीची आवक होते. रायगड जिल्ह्यातून लाल केळी चिपळुणात आणली जातात. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक बागायतदारही केळीचे उत्पादन घेत होते; मात्र मागील दोन वर्षात उत्पादनात घट झाली. त्यामुळे बाजारात केळीची आवक कमी झाली आहे. केळीचे दर वाढले आहेत. पूर्वी ३० ते ४० रु. डझन दराने मिळणारी केळी आता बाजारात ५० ते ७० रु. डझन दराने विकली जात आहेत. मागील दोन महिन्यापासून आवक कमी झाल्याने ही विक्रमी दरवाढ नोंदवली गेली आहे. यासोबत श्रावणसाठी बाजारात डाळिंब, सफरचंद आणि इतर फळांची आवक चांगली झाली आहे. पेरू व पपईची आवकदेखील वाढली आहे. अननस मात्र कमी दरात मिळत आहेत. शिमला सफरचंदची आवक सुरू झाली आहे. हिमाचल प्रदेशचा माल बाजारात येऊ लागला आहे. आवक वाढल्याने भावदेखील कमी होण्याची शक्यता आहे. केळी ५० ते ७०रु. डझन, पेरू ८० रु. किलो, पपई ३० ते ५० रु. किलो, एकनाथ डाळिंब दीडशे रू. किलो, ५० रु. एक नग, ड्रॅगनफ्रूट अडीचशे रु. किलो आणि सफरचंद २०० रु. किलो दराने बाजारात विकला जात आहे.
----------
कोट
श्रावण महिन्यात सर्वाधिक केळीची विक्री होते; पण घाऊक व्यापाऱ्यांकडून जादा भावाने खरेदी करावी लागत असल्याने काही भागात भाववाढ झाली आहे.
-रियाज तांबोळी, केळीविक्रेते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81713 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..