
पान दोन मेन-सावंतवाडीत कही खुशी, कही गम
L39195
सावंतवाडी ः आरक्षण सोडत चिठ्ठी काढताना शालेय विद्यार्थी नेस्टो फर्नांडिस.
सावंतवाडीत कही खुशी, कही गम
पंचायत समिती ः आरक्षण सोडत जाहीर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः येथील पंचायत समितीच्या अठरा मतदार संघातील सदस्यपदांसाठीची आरक्षण सोडत आज तहसीलदार कार्यालय येथे काढण्यात आली. प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून ही सोडत काढण्यात आली. यात काही दिग्गजांचे पत्ते कट झाले, तर काहींना पुन्हा संधी मिळाली आहे.
यामध्ये मळगाव मतदार संघासाठी अनुसूचित जाती स्त्री आरक्षण पडले आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी महिलांसाठी इन्सुली व सातार्डा मतदार संघात आरक्षण पडले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी सर्वसाधारणसाठी कोलगाव व न्हावेली मतदार संघात आरक्षण पडले आहे. तर कलंबिस्त, विलवडे, कारिवडे, माजगाव, चराठे व आरोंदा या मतदार संघात सर्व साधारण स्त्री आरक्षण पडले. माडखोल, आंबोली, तळवडे, शेर्ले, मळेवाड, बांदा व तांबोळी या मतदार संघात सर्वसाधारण म्हणजेच खुल्या गटासाठी आरक्षण पडले. तहसील कार्यालयात पार पडलेली ही सोडत शालेय विद्यार्थी नेस्टो फर्नांडिस याच्या हस्ते चिठ्ठी काढून काढण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील, नायब तहसीलदार मनोज मुसळे, कर्मचारी पूनम नाईक उपस्थित होते.
एकूणच आजच्या आरक्षण सोडतीनंतर पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहणार हे निश्चित असले तरी पडलेल्या आरक्षणामध्ये काहींचे पत्ते कट झाले, तर काहींना संधी प्राप्त झाल्याने काहींना आनंद तर, काहीजण निश्चितच नाराज झाले आहेत.
.........
विद्यमानाना पुन्हा संधी की नव्या चेहऱ्यांना?
आरक्षणामध्ये विद्यमान सदस्य असलेल्या माडखोल मतदार सघाच्या सुनंदा राऊळ, आंबोली मतदार संघाचे मोहन चव्हाण, कोलगाव मतदारसंघाचे मेघःश्याम काजरेकर, कारिवडे मतदारसंघातून प्राजक्ता केळुस्कर, तळवडे मतदार संघातून पंकज पेडणेकर, चराठा मतदार संघातून गौरी पावसकर, शेर्ले मतदार संघातून अक्षया खडपे, मळेवाडमधून मनीषा गोवेकर, न्हावेली मतदार संघातून रेश्मा नाईक, सातार्डा मतदार संघातून श्रृतिका बागकर, बांदा मतदार संघातून शीतल राऊळ, तांबोळीमधून निकिता सावंत याना पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आहे. तर कलंबिस्त मतदार संघातून रवींद्र मडगावकर, विलवडे मतदार संघातून संदीप गावडे, मळगाव मतदार संघातून रुपेश राऊळ, माजगाव मतदार संघातून बाबू सावंत, इन्सुली मतदार संघातून मानसी धुरी, आरोंदा मतदार संघातून संदीप नेमळेकर यांची संधी हुकली आहे. या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81723 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..