मालवणातही इच्छुकांचा पत्ता कट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणातही इच्छुकांचा पत्ता कट
मालवणातही इच्छुकांचा पत्ता कट

मालवणातही इच्छुकांचा पत्ता कट

sakal_logo
By

मालवणातही इच्छुकांचा पत्ता कट
पालिका सोडत ः सहा प्रभागांसाठी आरक्षण निश्चित
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ ः येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ ची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. यात काही विद्यमान नगरसेवकांचा तर काही इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट झाला आहे.
येथील पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात प्रांत वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्यासह नितीन वाळके, राजन वराडकर, गणेश कुशे, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, सन्मेष परब, पूजा सरकारे यांच्यासह पालिकेचे अन्य अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.
जून महिन्यात झालेल्या पालिकेच्या आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक तीन अ हा अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या आरक्षणात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे मुख्याधिकारी जिरगे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उर्वरित सहा प्रभागातील जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. रसेल फर्नांडिस या छोट्या मुलाने ही सोडत काढली.
निश्चित केलेले आरक्षण असे- प्रभाग १ अ-सर्वसाधारण, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग २ अ-सर्वसाधारण, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ अ-अनुसूचित जाती राखीव, ब-सर्वसाधारण महिला राखीव, प्रभाग ४ अ-सर्वसाधारण, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ५ अ-सर्वसाधारण, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ अ-सर्वसाधारण, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ९ अ-सर्वसाधारण, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग १० अ-सर्वसाधारण, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81725 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..