
मालवणात नव्या चेहऱ्यांना संधी
swt2812.jpg
39167
मालवणः पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीची चिठ्ठी काढताना कौशल जाधव.
मालवणात नव्या चेहऱ्यांना संधी
दिग्गजांना धक्केः पंचायत समितीतील चित्र
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ः येथील पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. या सोडतीत अनेक दिग्गजांना धक्के बसले आहेत. अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.
येथील तहसील कार्यालयात प्रांत वंदना खरमाळे आणि तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी कौशल जाधव या मुलाच्या हातून चिठ्ठी काढण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, अजिंक्य पाताडे, संतोष कोदे, अशोक बागवे, शशांक कुमठेकर, विजय केळुसकर, मोहन कुबल, विलास खिलाफे आदी उपस्थित होते. आरक्षण असे- अनुसुचित जाती महिला-आडवली-मालडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-शिरवंडे, मसुरे-मर्डे, नागरिकांचा मागास प्रवर्ग-सुकळवाड, सर्वसाधारण (महिला) ः पेंडुर, चिंदर, कोळंब, वराड, सर्वसाधारण (खुला प्रवर्ग)-चौके, कुंभारमाठ, आचरा, पोईप गोळवण, वायरी-भूतनाथ.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81726 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..