दाभोळ-दापोली पंचायत समितीत 7 जागा महिलांसाठी राखीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-दापोली पंचायत समितीत 7 जागा महिलांसाठी राखीव
दाभोळ-दापोली पंचायत समितीत 7 जागा महिलांसाठी राखीव

दाभोळ-दापोली पंचायत समितीत 7 जागा महिलांसाठी राखीव

sakal_logo
By

-rat२४p२५.jpg
ःL39206
दापोली ः पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सदस्यपदासाठी आरक्षण घोषित करताना तहसीलदार वैशाली पाटील.
-----------------
दापोली पंचायत समितीत
७ जागा महिलांसाठी राखीव
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २८ ः दापोली पंचायत समितीच्या १४ गणासाठी आज आरक्षणाची सोडत रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत आज पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात काढण्यात आली.
केळशी (सर्वसाधारण), जुईकर मोहल्ला ( सर्वसाधारण स्त्री), कुडावळे ( नामप्र स्त्री), पालगड (सर्वसाधारण), खेर्डी ( सर्वसाधारण स्त्री), टेटवली ( नामप्र), हर्णै ( अनुसूचित जमाती स्त्री), गिम्हवणे ( सर्वसाधारण), जालगाव (सर्वसाधारण), कोळबांद्रे (सर्वसाधारण), बुरोंडी ( सर्वसाधारण स्त्री), दाभोळ (सर्वसाधारण स्त्री), पांगारीतर्फे हवेली (सर्वसाधारण), उसगाव (नामप्र स्त्री). याचा समावेश आहे. मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत २ गण कमी होते; मात्र या निवडणुकीसाठी २ गण वाढले असून आता १४ पंचायत समिती सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३ जागा, अनुसूचित जातीजमातीसाठी १ जागा राखीव ठेवली आहे. १४ पैकी ७ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत तर १० जागा सर्वसाधारणसाठी राखीव असून त्यातील ४ जागा महिलासाठी राखीव आहेत. या आरक्षण सोडतीसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, निवासी नायब तहसीलदार शरदकुमार आडमुठे, नायब तहसीलदार (महसूल) रणजीत शिराळकर तसेच तहसील व पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
------------
ग्राफ करावा
एक नजर..
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जागाः ३
अनुसूचित जातीजमातीसाठी जागा राखीवः १
महिलांसाठी आरक्षित ठेवल्याः ७ जागा
सर्वसाधारणसाठी राखीव जागाः १०
त्यातील जागा महिलासाठी राखीवः ४

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81756 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top