
चिपळूण-चिपळुणातील 14 जागा महिलांसाठी राखीव
चिपळुणातील १४ जागा महिलांसाठी राखीव
पालिका आरक्षण; प्रभाग आठ अ अनुसूचित जाती महिलांसाठी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत गुरुवारी (ता. २८) जाहीर करण्यात आली. त्यामध्ये एकमेव प्रभाग क्र. ८ (अ) हा अनुसूचित जातीकरिता महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. संपूर्ण शहरात २८ पैकी १४ जागा महिलांसाठी राखीव आहेत.
चिपळूण नगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची पाच वर्षांची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात आली होती; मात्र ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे शासनाने सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलून आधीचे आरक्षणही रद्द केले होते; मात्र आता ओबीसी आरक्षणवर शिक्कामोर्तब होताच न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने निवडणूक आयोगाने पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरदेखील कार्यवाही सुरू केली आहे. नवीन प्रभागरचना यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गुरुवारी शहरातील एल टाईप शॉपिंग सेंटर येथे पार पडला. प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी निवडणूक आयोगाचे निर्देश स्पष्ट केले. या वेळी प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, राजेंद्र खातू हे अधिकारी उपस्थित होते तर शिवसेनेचे माजी शशिकांत मोदी, उमेश सकपाळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शहा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी व विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शहरात एक प्रभाग वाढवण्यात आला असून २ नगरसेवक वाढणार आहेत. त्यामुळे नवीन नगर पालिका सभागृहात आता २८ नगरसेवक दिसणार आहेत. त्यानुसार आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रत्येक प्रभागात एक महिला आरक्षण राखीव ठेवण्यात आले असून एक जागा सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी असणार आहे.
...
चौकट
या वेळी महिलावर्गासाठी आरक्षित..
शहरातील प्रभाग क्र. ८ (अ) अनुसूचित जाती महिलावर्गासाठी आरक्षित केला आहे. त्यामध्ये शहरातील खेंड बावशेवाडी व बाजारपेठेचा काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे. गेल्या वेळीदेखील हाच प्रभाग अनुसूचित जाती वर्गासाठी आरक्षित होता; परंतु त्या वेळी पुरुषवर्गासाठी आरक्षित होता. त्यामुळे या वेळी महिलावर्गासाठी आरक्षित केला आहे.
------
चौकट
प्रभाग १- अ* ब
सर्वसाधारण महिला*सर्वसाधारण
प्रभाग २*नामाप्र सर्वसाधारण*सर्वसाधारण महिला
प्रभाग ३*सर्वसाधारण महिला*सर्वसाधारण
प्रभाग ४*सर्वसाधारण महिला*सर्वसाधारण
प्रभाग ५*नागरिकांचा मागास प्रवर्ग*सर्वसाधारण
प्रभाग ६*सर्वसाधारण महिला*सर्वसाधारण
प्रभाग ७*सर्वसाधारण महिला*सर्वसाधारण
प्रभाग ८*अनुसूचित महिला*सर्वसाधारण
प्रभाग ९*नामप्र सर्वसाधारण*सर्वसाधारण महिला
प्रभाग १०*नामाप्र सर्वसाधारण*सर्वसाधारण महिला
प्रभाग ११*नामाप्र महिला*सर्वसाधारण
प्रभाग १२*नामाप्र*सर्वसाधारण
प्रभाग १३*नामाप्र महिला*सर्वसाधारण
प्रभाग १४*सर्वसाधारण महिला*सर्वसाधारण
-----------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81757 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..