
सिंधुदुर्गात दुग्धक्रांतीचा संकल्प
swt२८५.jpg
३९०९०
कलंबिस्तः मेळाव्यात मार्गदर्शन करताना जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी. बाजूला संचालक रवींद्र मडगावकर, डॉ. प्रसाद देवधर, सुनील राऊळ, शरद नाईक, लव भिंगारे, शिवराम जोशी, पांडुरंग राऊळ आदी.
सिंधुदुर्गात दुग्धक्रांतीचा संकल्प
मनीष दळवीः कलंबिस्त येथे कर्ज वाटप योजना मेळावा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ः सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून दुग्ध, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मेंढीपालन अशा शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून विकासाची नवी क्रांती घडवायची आहे. यासाठी जिल्हा बँकेने दुधाळ गाईम्हैशींसाठी कर्ज योजना सुरू केली आहे. दोन कोटीचे कर्ज वितरित करण्याचा संकल्प आहे. या माध्यमातून जवळपास ३ हजारहून अधिक म्हैशी जिल्ह्यात आणून दिवसाला एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट आहे. येत्या पाच वर्षांत सिंधुदुर्गात दुग्धक्रांतीची नवी पहाट उजाडेल, असा विश्वास जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी व्यक्त केला.
याची सुरुवात सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात करण्यात येत असून, या ठिकाणी वर्षभरात पाचशे लिटर दूध संकलित करण्याच्या दृष्टीने काम केले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक, सैनिक नागरी सहकारी पतसंस्था व सह्याद्री फाउंडेशन यांच्यावतीने कलंबिस्त ग्रामपंचायत येथे आयोजित पशुसंवर्धन व कृषी तसेच दुग्ध जनावरांना कर्ज वाटप योजना उपक्रम मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने श्री. दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. प्रसाद देवधर, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे सीईओ सुनील राऊळ, चेअरमन शिवराम जोशी, सरपंच शरद नाईक, शिरशिंगे उपसरपंच पांडुरंग राऊळ, उपसरपंच सुभाष राऊळ, नारायण राऊळ, कॅ. दीनानाथ सावंत, कॅ. सुभाष सावंत, सह्याद्री फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद तावडे, कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध संस्थेचे चेअरमन ॲड. संतोष सावंत, वेर्ले दुग्ध संस्थेचे चेअरमन श्री. लिंगवत, शंकर राऊळ, जिल्हा बँकेचे सांगेली शाखा व्यवस्थापक बोडके, सांगेली दुग्ध संस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, सोसायटीचे उपाध्यक्ष अंतोन रॉड्रिक्स, सैनिक स्कूलचे दीपक राऊत, प्रताप परब, शिरशिंगे दुग्ध संस्थेचे चेअरमन देसाई, सागर तांबेकर, लवू भिंगारे, कृषी सहाय्यक सौ. राऊळ, गजानन राऊळ, अशोक राऊळ, गणपत राणे, सुनील सावंत, राजेश पास्ते, अनिल राऊळ, सिद्धेश सावंत आदी उपस्थित होते.
श्री. दळवी म्हणाले, "पशुसंवर्धन विकासासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून दोन कोटी कर्ज वितरित करण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत सव्वा कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तीन हजार म्हैशींची खरेदी या माध्यमातून करायची असून तरुणांना एक नवा उद्योग व्यवसाय उभारून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणायचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार लिटर दूध संकलन होत आहे. हे दूध संकलन एक लाख लिटरपर्यंत नेण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. येत्या पाच वर्षांत हे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त पंचक्रोशीत दुग्ध क्रांती घडेल, या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांसाठी कर्ज योजनेचा लाभ घ्यावा."
डॉ. देवधर म्हणाले, "ही पंचकोशी सैनिकी परंपरेची आहे. देशसेवेनंतर आता गावाचा विकास आणि सेवेसाठी कार्यरत रहा. तरुणांना दुग्ध आणि शेती उद्योग व्यवसायाकडे वळवा. तुमच्या घरी जरी एक गाय असेल, तरी तुम्ही आरोग्य, मानसिक व आर्थिक दृष्ट्या सधन आहात. दुग्थ व्यवसायाकडे संधी म्हणून बघा. कलंबिस्तसारख्या शहरालगतच्या गावाने ही दुग्धक्रांती घडवून आणल्यास एक नवा प्रकल्प उभा राहून नव्या विकासाला गती येईल."
यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी दीपक राऊळ, विठ्ठल राऊळ, पांडुरंग लाड, मनाजी धोंड, एकनाथ राऊळ, अंकुश घाडी, अशोक राऊळ आदींना कर्ज वाटप करण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81800 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..