निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

swt2832jpg
L39244
सूर्यकांत पेडणेकर

सूर्यकांत पेडणेकर यांचे निधन
सावंतवाडी, ता. २८ः तालुका भंडारी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार तथा जिल्ह्यातील ज्येष्ठ सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सूर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर (वय 85, रा. सर्वोदयनगर) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे ते संस्थापक होते. तसेच सावंतवाडी भंडारी मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे ते मार्गदर्शक होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे ते फाऊंडर मेंबर होते. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात व सभेला ते आवर्जून हजर असायचे. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. सावंतवाडीतील मुक्ताई अॅकॅडमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर यांचे ते वडील होत.
................
swt2833.jpg
39245
दत्ताराम राऊळ

दत्ताराम राऊळ यांचे निधन
सावंतवाडी, ता. २८ ः मळगाव देवस्थानचे ज्येष्ठ मानकरी तथा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ हरिभक्त दत्ताराम गोविंद तथा दत्तूभाऊ राऊळ (वय 90, रा. कुंभार्ली) यांचे बुधवारी निधन झाले. मळगाव देवस्थानच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये ते हिरीरीने सहभाग घेत असत. मळगाव येथील वारकरी संप्रदायातील प्रमुख वारकरी (वै.) दिगंबर नाटेकर यांचे ते सहकारी होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, पुतणे, पुतण्या, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
...................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81819 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..