थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील मुले चमकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील मुले चमकली
थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील मुले चमकली

थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील मुले चमकली

sakal_logo
By

39340
लातूर ः थाई बॉक्सिंगमध्ये पदके मिळविलेले विद्यार्थी.

थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये
सिंधुदुर्गला पाच पदके

लातूरमधील स्पर्धेत दमदार कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २९ ः राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गनगरी येथील मुलांनी दमदार कामगिरी केली. यात या मुलांनी दोन सुवर्णपदक, एक रौप्य आणि दोन कास्य पदकांची कमाई केली. १८ वी महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धा लातूर येथे पार पडली. जिल्ह्यातून निवडक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्गच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट अशी कामगिरी बजावत दोन सुवर्ण, एक रौप्य व दोन कास्य पदकांची कामाई केली. या स्पर्धेमध्ये दिशा पवार (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) व चित्राक्षा मुळये (एस. आर. एम कॉलेज कुडाळ) यांना सुवर्ण, निर्जला कदम (एस. आर. एम कॉलेज कुडाळ) हिला रौप्य, नितेश गुप्ता (न्यू इंग्लिश स्कूल ओरोस) आणि जिशिना नायर, कराटे प्रशिक्षक (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल) यांना कास्य पदक प्राप्त झाले. थाय बॉक्सिंग हा शालेय खेळ असून येणाऱ्या शालेय थाई बॉक्सिंग शालेय स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष, वर्ल्ड थाई बॉक्सिंग असोसिएशनचे पंच तसेच छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोसचे प्राध्यापक अ‍ॅड. विवेक राणे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81946 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top