
अरुण सावंत यांना मनसेतर्फे श्रद्धांजली
39341
सावंतवाडी ः (कै.) अरुण लक्ष्मण सावंत श्रद्धांजली वाहताना परशुराम उपरकर व पदाधिकारी.
अरुण सावंत यांना
मनसेतर्फे श्रद्धांजली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले (कै.) अरुण लक्ष्मण सावंत यांचा आठवा स्मृतिदिन मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेच्या सावंतवाडी शहर मध्यवर्ती कार्यालयात साजरा करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत श्रद्यंजली वाहिली. यावेळी उपरकर यांनी (कै.) अरुण सावंत यांच्या आठवणींना उजाळा दिला. (कै.) सावंत यांचा जनमाणसात आदर्श व्यक्तिमत्व आसा ठसा होता. बाळासाहेब यांचे कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. ज्याठिकाणी अन्याय दिसेल त्या ठिकाणी न्याय देण्याकरिता पुढाकार असे. माझे व त्यांच कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध होते. माझे ते अत्यंत जवळचे सहकारी होते, असे सांगितले. यावेळी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, कौस्तुभ नाईक, राजेश टंगसाळी, लक्ष्मीकांत हरमलकर, अभय देसाई, बंटी मठकर, गोविंद मोर्ये आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81947 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..