संगणक मिळताच विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगणक मिळताच विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य
संगणक मिळताच विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य

संगणक मिळताच विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य

sakal_logo
By

39342
दोडामार्ग ः येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात फित कापून संगणक कक्षाचे उद्‍घाटन करताना मान्यवर.


संगणक मिळताच विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य

दोडामार्ग हळबे महाविद्यालय; कामत यांच्याकडून दहा संचाची देणगी

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २९ ः मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील उपकेंद्राचे माजी सहायक कुलसचिव व नवनिर्माण शिक्षण संस्थेचे माजी संचालक (कै.) बालाजी कामत यांचे चिरंजीव सूरज कामत यांच्याकडून येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयास दहा संगणक संच देणगी म्हणून देण्यात आले. त्याचे उद्‍घाटन संस्थेचे ज्येष्ठ सदस्य भाई परमेकर यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्टे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विवेकानंद नाईक, प्राचार्य डॉ. सुभाष सावंत आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्टे म्हणाले की, ‘‘नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या उभारणीत व जडणघडणीत डॉ. कामत यांचे मोठे योगदान होते. संस्थाचालक प्राचार्य व कर्मचारी यांना जोडून ठेवणारा दुवा म्हणून त्यांनी महत्त्वाचे काम केले. ते नेहमी हसतमुख असणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणली. प्रामाणिकपणा रुजवला. झोकून देऊन काम करण्याची जिद्द निर्माण केली. मुंबई विद्यापीठाच्या रवागिरी उपकेंद्रातून निवृत्त झाल्यानंतर प्रशासकीय कामकाज सांभाळण्यासाठी आमच्या निमंत्रणाला मान देऊन ते संस्थेत आले. त्यांच्या कामाची पद्धत, संस्थेविषयीची तळमळ पाहून त्यांना आम्ही संस्थेच्या कार्यकारिणीवर घेतले आणि त्यांनी संस्था उभारणीत मोठे योगदान दिले. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव सुरज कामत यांनीही संस्थेच्या उभारणीस हातभार लावला आहे.’’ संगणक संच प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयीन कर्मचारी योगेश ठाकूर यांनी प्रयत्न केले होते. डॉ. सोपान जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पी. डी. गाथाडे यांनी आभार मानले.
--
विद्यार्थ्यांविषयी तळमळ
सुरज कामत हे बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियरपदी कार्यरत आहेत. आपल्या वडिलांची शिक्षणावरील निष्ठा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांविषयीची तळमळ पाहून दोडामार्गसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संगणक शिक्षक मिळावे या उद्देशाने त्यांनी या महाविद्यालयास दहा संगणकाची भेट दिली. (कै.) बालाजी कामत यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संगणक कक्षाचे उद्‍घाटन केले. तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आधुनिक युगात नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन हेगशेट्टे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81956 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top