गव्यांच्या कळपाचा दिगवळे येथे वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गव्यांच्या कळपाचा दिगवळे येथे वावर
गव्यांच्या कळपाचा दिगवळे येथे वावर

गव्यांच्या कळपाचा दिगवळे येथे वावर

sakal_logo
By

39343
दिगवळे ः येथील रस्त्यावर रात्रीच्यावेळी दिसलेला गवा.

गव्यांच्या कळपाचा
दिगवळे येथे वावर

बंदोबस्ताची वनविभागाकडे मागणी

कनेडी,ता. २९ ः दिगवळे गावातील गावडेवाडी, राजंणगाव या वस्तीत रान गव्यांच्या कळपाने प्रवेश केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. दाजीपूर अभ्यारण्यातील गव्यांचा कळप कोकणातील भातशेतीचे नुकसान करू लागला आहे. वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दिगवळे गावाची सीमा ही दाजीपूर अभ्यारण्या जवळ आहे. गतवर्षी २२ जुलैला पहाटे रांजणगाव येथे डोंगराची कडा कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर जंगलमय भागातून रानटी जणावरे या मातीच्या कोसळलेल्या भागातून वस्तीत येत आहेत. यापुर्वी रानगाय शेतात येत होत्या. अलिकडे पावसाळा सुरू झाल्यानंतर भातशेती खाण्यासाठी गव्यांचा कळप वस्तीच्या दिशेने प्रवेश करत आहे. सध्या या परिसरात अनेक गव्यांचा कळप वावरताना दिसत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81958 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..