रत्नागिरी- कोतवड्यात अंगणवाड्यांना गॅसजोडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- कोतवड्यात अंगणवाड्यांना गॅसजोडणी
रत्नागिरी- कोतवड्यात अंगणवाड्यांना गॅसजोडणी

रत्नागिरी- कोतवड्यात अंगणवाड्यांना गॅसजोडणी

sakal_logo
By

rat29p5.jpg ः
39354
रत्नागिरी ः कोतवडे गावात अंगणवाड्यांना गॅसजोडणी, डिजिटल वजनकाट्यांचे वितरण करताना सरपंच तुफील पटेल. सोबत अंगणवाडी सेविका, कर्मचारी.
-----------
कोतवड्यात अंगणवाड्यांना गॅसजोडणी

ग्रामपंचायतीतर्फे वितरण; मुलांसाठी डिजिटल वजन काटे

रत्नागिरी, ता. 29 ः कोतवडे गावातील सर्व अंगणवाड्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गॅसजोडणी व डिजिटल वजनकाट्यांचा पुरवठा करण्यात आला. उंबरवाडी, मुस्लिमवाडी, धामेळेवाडी, वारे- ढोकमळे, गावणवाडी, बाजारपेठ, घारपुरेवाडी, कुंभारवाडा या आठ अंगणवाड्यांना याचा लाभ झाला.
शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळत असलेला पोषण आहार शिजवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना इंधनाची मोठी समस्या भासत होती. अन्न शिजवण्यासाठी गॅस कनेक्शनची अत्यंत आवश्यकता आहे. ही बाब ग्रामपंचायतने लक्षात घेऊन पंधरावा वित्त आयोग निधीतून तशी तरतूद करून अंगणवाड्यांची मागणी पूर्ण केली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे अचूक वजन व्हावे यासाठी ग्रामपंचायतीमधून या आठही अंगणवाड्यांना डिजिटल वजनकाट्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. गॅस शेगडी, सिलेंडर, रेग्युलेटर, सुरक्षा पाईप यांचे वाटप करण्यात आले. अंगणवाडीतील मुलांचे अचूक वजन करण्यासाठी ग्रामपंचायत कोतवडेच्यावतीने डिजिटल वजनकाटे देण्यात आले. या वेळी सरपंच तुफील पटेल, उपसरपंच संतोष बारगोडे, ग्रामविकास अधिकारी देविदास इंगळे, पायल पांचाळ, ज्योती मयेकर, दिया कांबळे, चांदबी बारगीर, ज्योती वारेकर आदी उपस्थित होते. अंगणवाडी पर्यवेक्षिका मंजिरी पवार, श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शिवपूजे, प्राथमिक शाळा कुंभारवाडाच्या मुख्याध्यापिका साळवी, घारपुरेवाडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका केळकर, प्राथमिक शाळा उर्दूचे शिक्षक कुरेशी, वारे-ढोकमळे प्राथमिक शाळेचे शिक्षक किरण भुवड, गावातील ग्रामस्थ अश्फाक पटेल, अजय मयेकर, सुरेश भोसले, राजेंद्र कांबळे, अश्फाक बारगीर, जगदीश वारेकर, आशासेविका लांजेकर, जोगळेकर, सर्व अंगणवाडीसेविका आदी उपस्थित होते.

-- बातमीदार- मकरंद पटवर्धन... 29.7.2022

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81970 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..