
टुडे पान दोन मेन-सखोल ज्ञान हाच यशाचा पाया
L39389
मालवण ः तालुका पत्रकार समितीच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात तहसीलदार अजय पाटणे यांचा सत्कार करण्यात आला.
सखोल ज्ञान हाच यशाचा पाया
अजय पाटणे ः मालवण पत्रकार समितीच्या स्पर्धा परीक्षा उपक्रमात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २९ ः विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून एकाग्रतेने अभ्यास करावा. सातत्यपूर्ण अभ्यास व त्यातून मिळालेले सखोल ज्ञान हाच यशाचा पाया आहे. कठोर परिश्रम, सखोल अभ्यास व वेळेचे नियोजन या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास स्पर्धा परिक्षेत यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन तहसीलदार अजय पाटणे यांनी येथे केले. तालुका पत्रकार समिती यांच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाचा शुभारंभ धी आचरा पीपल्स असोसिएशन संचालित न्यू इंग्लिश स्कुल आचरा येथे तहसीलदार पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. पहिल्या सत्रात तहसीलदार पाटणे यांच्यासह पोलीस अधिकारी कुलदीप पाटील व दुसऱ्या सत्रात उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
पाटणे म्हणाले, "स्पर्धा परीक्षा देण्यासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर ही शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. दहावी, बारावी किंवा पदवी परीक्षेत खूप अभ्यास करूनही अपेक्षित गुण मिळाले म्हणून कोणीही खचून जाऊ नये. पदवी परीक्षेत कमी गुण असले तरी स्पर्धा परिक्षात मोठे यश मिळू शकते. परीक्षा देताना चालू घडामोडीसह वृत्तपत्रे, मासिक अंकाचे अवांतर वाचन केलेच पाहिजे. यूपीएससी, एमपीएससीसारख्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सखोल ज्ञान घेणे आवश्यक असते. प्राथमिक टप्प्यात ''ग्रुप स्टडी'' खूप फायदेशीर ठरते. जुने प्रश्नसंच सोडवण्याचा प्रयत्न करा, त्यातून व्यवस्थितपणे सरावही होतो. याच काळात मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी व्यायाम, खेळ प्रकारांनाही प्राधान्य द्या. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुख्य परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. सातत्य आणि एकाग्रता यशाच्या शिखरावर नेते." आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संतोष गावडे यांनी केले.
सूत्रसंचालन शिक्षिका मधुरा माणगावकर यांनी केले. मुख्याध्यापक गोपाळ परब यांनी आभार मानले.
व्यासपीठावर स्कुल कमिटी अध्यक्षा नीलिमा सामंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गावडे, उपाध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, सचिव कृष्णा ढोलम, सहसचिव परेश सावंत, खजिनदार सिद्धेश आचरेकर, जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणी सदस्य महेश सरनाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, निलेश सारजोशी, मुख्याध्यापक गोपाळ परब, इंग्लिश मिडीयम मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस,बीएमएस प्राचार्य दळवी, राजन पांगे, संजय पाटील, बाबाजी भिसळे, प्रफुल्ल देसाई, अमित खोत, कुणाल मांजरेकर, प्रशांत हिंदळेकर, सुरेश ठाकूर, आपा मालंडकर, उदय बापर्डेकर, संदीप बोडवे, नितीन आचरेकर आदी उपस्थित होते.
------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82022 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..