कणकवली : अारक्षण जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : अारक्षण जाहीर
कणकवली : अारक्षण जाहीर

कणकवली : अारक्षण जाहीर

sakal_logo
By

खारेपाटण ग्रामपंचायत आरक्षणावर ग्रामस्थांचा आक्षेप

आरक्षणे चुकीच्या प्रभागात टाकल्याचा आरोप : फेर आरक्षणालाही विरोध

खारेपाटण, ता.२९ : खारेपाटण ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग साठीच्या दोन जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र चुकीच्या प्रभागात अनुसुचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण टाकण्यात आल्‍याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच खारेपाटण ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीवर हरकत घेणार असल्‍याचाही मुद्दा ग्रामस्थांनी मांडला.
खारेपाटण ग्रामपंचायतीच्या ११ पैकी ९ जागांसाठी यापूर्वीच आरक्षण सोडत काढण्यात आली होती. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग निश्‍चित करण्यासाठी आज पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात आली. पिठासीन अधिकारी सूर्यकांत वारंग यांच्या अध्यक्षतेखाली ही अारक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव, योगेश पाटणकर,शमशुद्दीन काझी,शंकर राऊत, उज्वला चिके, अंजली कुबल, रीना ब्रम्हदंडे,सोनल लोकरे, फरहाना सारंग, ग्रामविकास अधिकारी जि सी वेंगुर्लेकर, तलाठी के सिंगनाथ आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आजच्या आरक्षण सोडतीलाही उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला.
खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम आणि ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव यांनी आरक्षण सोडतीला विरोध केला. सदर आरक्षण आम्हाला मान्य नसल्याचे सांगून आम्ही याबाबत हरकत घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रभाग क्र.२ मध्ये बहुसंख्य मुस्लिम मतदार अाहेत. तरीही या प्रभागात अनु जाती महिला प्रवर्ग – १ व नागरिकांचा मागास प्रवर्ग – १ व सर्वसाधारण स्त्री -१ राखीव झाल्यामुळे येथील प्रभागावर अन्याय झाला असल्याचे उपसरपंच इस्माईल मुकादम यांनी सांगितले.
प्रभाग क्र.३ मध्ये देखील मुस्लिम मतदार असून येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – १ व सर्वसाधारण – १ जागा राखीव झाल्याने येथील प्रभागावर अन्याय झाल्याचे महेंद्र गुरव यांनी सांगितले. तर प्रभाग क्र.१ बहुसंख्य अनु.जातीची लोकसंख्या असताना देखील तेथे अनु जाती करीता राखीव जागा नसल्याने येथील प्रभागातील जनतेवर अन्याय झाल्याचे ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर यांनी यावेळी सांगितले.
पिठासन अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी आरक्षण सोडतीनंतर काही हरकती असल्यास त्या सादर कराव्यात असे आवाहन केले.
-----------
चौकट

प्रभाग क्र.१ –
– सर्वसाधारण स्त्री – २, सर्वसधारण -१
प्रभाग क्र.२ – अनु जाती महिला -१, नागरिकांचा मागास प्रवर्ग – १, सर्वसाधारण स्त्री – १
प्रभाग क्र.३ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – १,सर्वसाधारण – १
प्रभाग क्र.४ — – सर्वसाधरण स्त्री – १, सर्वसाधरण – २

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82040 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..