चिपळुणात शनिवारी ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम दुर्गे प्रथम स्मृतिदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात शनिवारी ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम दुर्गे प्रथम स्मृतिदिन
चिपळुणात शनिवारी ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम दुर्गे प्रथम स्मृतिदिन

चिपळुणात शनिवारी ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम दुर्गे प्रथम स्मृतिदिन

sakal_logo
By

‘गावभवरा’ चे
आज प्रकाशन
चिपळूण, ता. २९ः संवेदनशील आणि प्रगल्भ सामाजिक भान असणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम दुर्गे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या चिपळूण शाखेच्यावतीने दुर्गे यांच्या ‘गावभवरा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन आणि स्मृतीदिन अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत शनिवारी (ता. ३०) सायंकाळी साडेपाच वाजता लोकमान्य टिळक स्मारकाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात हा कार्यक्रम होईल. दुर्गे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष होते. त्यांची बहुतांश साहित्य संपदा चिपळूण या त्यांच्या कर्मभूमीत निपजली आहे. डॉ. चोरगे यांच्या हस्ते ‘गावभवरा’ कथासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. ‘संविधानिक मूल्यांवर आधारित व्यवस्था परिवर्तन’ हे दुर्गे यांच्या साहित्याचे वेगळेपण होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या सर्व साहित्यात उमटलेली दिसतात. मानवी जीवन हे मूल्याधारित असावे, अशी धारणा घेऊन दुर्गे साहित्यक्षेत्रात वावरले. त्यांनी आपल्या कथा, कादंबऱ्यातून सामान्य माणसाला नायक बनवले होते. सामान्य माणसाचे जगण्याचे प्रश्न समाजासमोर मांडले होते. सामाजिक बांधिलकी आणि चिंतनशील स्वभाव या द्वारे एक आदर्श शिक्षक ते संवेदनशील साहित्यिक असा त्यांचा प्रवास होता.
दुर्गे सरांचे निधन हे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण करणार आहे. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोमसाप चिपळूण अध्यक्षा डॉ. रेखा देशपांडे आणि मसाप चिपळूण शाखाध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82054 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top