रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२९p६.jpg ःKOP२२L३९३५५
दापोली ः द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्याबद्दल पिसई गावात वनवासी कल्याण आश्रमतर्फे आयोजित आनंदोत्सव कार्यक्रमात बोलताना जान्हवी नित्सुरे. सोबत आनंद साठ्ये, मंजुषा साठ्ये आदी.


पिसईत वनवासी कल्याण आश्रमातर्फे आनंदोत्सव
रत्नागिरी ः वनवासी कल्याण आश्रमातर्फे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू पहिल्या जनजाती महिला राष्ट्रपती झाल्यानिमित्ताने पिसई गावातील आदिवासी पाड्यावर उत्सव साजरा करण्यात आला. सर्वांना पेढे वाटप केले. कल्याण आश्रमाचे रत्नागिरी जिल्हा सचिव आनंद साठ्ये, सहसचिव मंजुषा साठ्ये, चिखलगाव वसतिगृहाचे प्रमुख हनुमंत रढे, जिल्हा सहकोषाध्यक्ष अद्वैत नित्सुरे, जिल्हा महिलाप्रमुख जान्हवी नित्सुरे, कार्यकर्ते अजय निकम व सागर निकम, पिसई पाड्यावरील आरोग्यरक्षक आराध्या वाघमारे, पाड्यावरील इतर महिला व पुरुष उपस्थित होते. त्या वेळी जान्हवी यांनी कल्याण आश्रम व राष्ट्रपती श्रीमती द्रुपदी मुर्मू यांच्याबद्दलची माहिती सांगितली. एका सामान्य घरातून महिलेचा शिक्षिका ते राष्ट्रपती हा प्रवास व त्यात असंख्य आलेल्या अडचणींवर केलेली मात, हा त्यांचा प्रवास उलगडून सांगितला. त्या वनवासी कल्याण आश्रमातूनच तयार झाल्या आहेत तसेच कोणीही स्वतःला कमी लेखू नये. आराध्या यांनीदेखील आपल्याच समाजातील एक वनवासी महिला निवडून आल्याबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिनंदन केले.

फोटो ओळी
-rat२९p७.jpg ः२L३९३५६ रत्नागिरी ः के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात दीपप्रज्वलन करताना विद्यार्थी व मुख्याध्यापक.
-------------
अभ्यंकर मुकबधिर विद्यालयात दीपपूजन
रत्नागिरी ः दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात दीपपूजनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. श्रावण अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्यात आली. या निमित्त विद्यार्थ्यांनी दिव्यांची चित्रे काढली. विविध दिवे प्रज्वलित करून त्यांचे पूजन केले. दीपपूजेचे महत्त्व विद्यालयातील विशेष शिक्षिका सीमा मुळ्ये यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या वेळी मुख्याध्यापक गजानन रजपूत, सहकारी शिक्षक, पालक आणि नरोना आदी उपस्थित होते.

दापोलीत ४ हजार २३७ लाभार्थ्यांना बूस्टर लस
दाभोळ ः दापोली तालुक्यात आतापर्यंत ४ हजार २३७ लाभार्थ्यांनी बूस्टर डोस घेतल्याने आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. आरोग्य केंद्र तसेच ग्रामपंचायतीमध्ये ही मोहीम सुरू असून, स्थानिक ग्रामस्थ याचा लाभ घेत आहेत.

खदिजा स्कूलचे दहावी परीक्षेत सुयश
दाभोळ ः दापोली तालुक्यातील विसापूर येथील उम्मे खदिजा इंग्लिश मीडियम स्कूलने १०वी (सीबीएसई) बोर्ड परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. या शाळेतील विद्यार्थी साहिम भोरे (९४ टक्के), मसिहा गैबी (९३), साद जुवले (९२), जैनब मालवणकर (९०), उमेरा दुस्ते (८९), दानिया अली (८३) यांनी गुण मिळवून यश मिळवले आहे. शाळेचे संचालक अब्दुल गैबी, मुख्याध्यापक गफूर, सुपरवायझर रईसा मालवणकर, सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .


अशोक जाधव यांची निवड
संगमेश्वर ः अशोक जाधव हे एक मराठी राजकारणी व सध्या रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रांताध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांनी मान्यता दिल्यानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीअंतर्गत असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी सामाजिक न्याय विभाग पुनर्वसन सदस्य महाराष्ट्र शासन) म्हणून त्यांनी योग्यरित्या आपली जबाबदारी बजावली आहे. उत्कृष्ट राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक न्याय व पुनर्वसन सदस्य (महाराष्ट्र शासन), शेतकरी-कष्टकरी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष, रत्नागिरी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशा विविध पदावर काम केलेले अनुभव असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82055 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..