
75 वर्षीय महिलेची पित्ताशयाच्या कर्करोगावर यशस्वी मात
ratchl२८२.jpg
३९१४०
डॉ. सचिन कदम
---------------
पित्ताशयाच्या कर्करोगावर वृद्धेची यशस्वी मात
डॉ. सचिन कदम यांच्या चमुचे उपचार; चिपळूण येथे शस्त्रक्रिया
चिपळूण, ता. २९ः ७५ वर्षीच्या महिलेने पित्ताशयाच्या कर्करोगावर यशस्वी मात केली. चिपळूण येथील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरमध्ये कॅन्सर सर्जन डॉ. सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली या महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले.
पित्ताशय (गॉलब्लॅडर) हे आकाराने पेर या फळासारखे असून साधारणपणे ८ ते १० सें. मी. लांब व ३ सें.मी. रुंद असते. यकृतात बनलेल्या पित्ताची साठवणूक करणे तसेच अन्नपचनाकरिता ते लहान आतड्यांकडे पाठवणे ही त्याची कार्ये असतात. साधारणपणे ३० ते ५० मि. ली. बाईल साठवण्याची क्षमता असते. या रुग्णाच्या शरीरात कर्करोगाने यकृतात प्रवेश केला होता. तसेच तो जवळपासच्या लसिका ग्रंथी (पोर्टल लिम्फ नोड्समध्ये) पसरला होता. तिच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. ज्यात यकृताचा काही भाग, पित्ताशय, लसिका ग्रंथी आणि पित्ताशयाची नळी (रॅडिकल कोलेसिस्टेक्टोमीसह पोर्टल नोडल क्लीअरन्ससह लीवर रिसेक्शनसह हेपॅटिको-जेजुनोस्टोमी) काढण्यात आले. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक होती. तिला ६ व्या दिवशी घरी सोडण्यात आले. नंतर तिला सहाय्यक केमोथेरपीचा सल्ला देण्यात आला. रुग्ण सध्या फॉलोअपमध्ये आहे आणि कर्करोगमुक्त आहे, अशी माहिती ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरचे कॅन्सर सर्जन डॉ. सचिन कदम यांनी दिली.
डॉ. कदम म्हणाले, पित्ताशयाचा कर्करोग हा अत्यंत घातक असून बहुधा वयस्कर रुग्णांमध्ये आढळतो. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये दोन ते सहा पटीने जास्त आढळतो. जगामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण पित्ताशयाच्या कॅन्सरने ग्रस्त असून दरवर्षी जगात १ लाख ८० हजार नवीन रुग्ण पित्ताशयाच्या कॅन्सरने पीडित होतात तसेच जवळपास १ लाख ४० हजार रुग्णांचा या कॅन्सरमुळे मृत्यू होतो. या आजारामुळे भारतामध्ये १९ हजार रुग्ण पीडित होतात तसेच जवळपास १६ रुग्ण दरवर्षी मृत्यू पावतात, अशी नोंद आढळते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82075 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..