परब हल्लाप्रकरणी पोलिस तपासावर ताशेरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परब हल्लाप्रकरणी पोलिस तपासावर ताशेरे
परब हल्लाप्रकरणी पोलिस तपासावर ताशेरे

परब हल्लाप्रकरणी पोलिस तपासावर ताशेरे

sakal_logo
By

संतोष परब हल्लाप्रकरणी
पोलिस तपासावर ताशेरे

लोकयुक्तांकडे सुनावणी; नीलेश राणेंनी केलेली तक्रार

मालवण, ता. २९ ः शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांच्या तपासावर लोकयुक्तांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना हेतुपुरस्सर त्यांना त्रास दिल्या प्रकरणी भाजप नेते नीलेश राणे यांनी लोकयुक्तांकडे अपील केले होते. त्याची दुसरी सुनावणी आज झाली. यावेळी लोकयुक्तांनी पोलिस अधीक्षकांना सत्तेच्या दबावाखाली न येता निःपक्षपातीपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. याबाबतची माहिती निलेश राणे यांनी पत्रकाद्वारे दिली.
संतोष परब हल्ला प्रकरणात कुठलेही पुरावे किंवा संबंध नसताना केवळ सत्तेच्या दबावाखाली आमदार नितेश राणे यांना हेतुपुरस्कर त्रास देण्याचा प्रयत्न जिल्हा पोलिस प्रशासनाकडून झाला. या प्रकरणात भाजप नेते नीलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षकांविरोधात लोकयुक्तांकडे तक्रार केली होती. आज त्याची दुसरी सुनावणी लोकायुक्तांकडे पार पडली. या सुनावणीत लोकायुक्तांनी सिंधुदुर्ग पोलिसांच्या चुकीच्या वर्तनावर कडक ताशेरे ओढत जिल्हा पोलिस अधीक्षकांना सत्तेच्या दबावाखाली न येता निःपक्षपातीपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या प्रकरणात नीलेश राणे यांना पुढे दाद मागायची असल्यास त्याच्याही मार्गदर्शक सूचना देणार असल्याची माहिती लोकायुक्तांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82126 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top