संक्षिप्त-2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-2
संक्षिप्त-2

संक्षिप्त-2

sakal_logo
By

बाबली गवंडेंना पुरस्कार
ओटवणे ः रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे यांना लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्यावतीने विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मळगाव येथील भगवती सभागृहातील कार्यक्रमात लायन्सचे माजी प्रांतपाल तथा पीएमजेएफ केशव फाटक, सावंतवाडीचे अध्यक्ष विद्याधर तावडे, उपाध्यक्ष अमेय पै. माजी अध्यक्ष अ‍ॅड. परिमल नाईक, मेंबरशिप चेअरमन अशोक देसाई, पीआरओ गजानन नाईक, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका खजिनदार सिद्धार्थ पराडकर आदी उपस्थित होते. गवंडे हे मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवक असून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे ते नियमित रक्तदाता सदस्य आहेत. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत गावात रक्तदान शिबिरे घेतली.
--
ओसरगाव शाळेत साहित्याचे वाटप
कणकवली ः विद्रोही कवी तथा फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उत्तम पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दर्पण प्रबोधिनी संस्थेतर्फे ओसरगाव नं १ शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी दर्पण प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे, सचिव सुभाष कदम, ओसरगाव ग्रामपंचायत सदस्य हेमंत तांबे, प्रा. डॉ. सोमनाथ कदम, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, श्रद्धा अपराज, राजू रोडये, वैशाली तारांगण, सायली मोहिते, राजेश कदम, डॉ. अशोक कदम, संतोष तांबे, विशाल हडकर, नितीन नागवेकर महेंद्र कदम, मुख्याध्यापक किशोर कदम, राजश्री तांबे, विलास चोडणेकर आदी उपस्थित होते.
--
मालवणात ७ ऑगस्टला सभा
मालवण ः मालवण तालुका निवृत्त सेवक संघाची ३८ वी वार्षिक सभा ७ ऑगस्टला दुपारी तीनला येथील टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82139 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..