रेल्वेच्या धडकेत तीन गुरे ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेच्या धडकेत तीन गुरे ठार
रेल्वेच्या धडकेत तीन गुरे ठार

रेल्वेच्या धडकेत तीन गुरे ठार

sakal_logo
By

रेल्वेच्या धडकेत तीन गुरे ठार

कोचिवली एक्स्प्रेसची साकेडीत धडक; ‘जनशताब्दी’ २० मिनिटे खोळंबली

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २९ ः मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोचिवली-भावनगर एक्स्प्रेसची जोरदार धडक बसून तीन गुरे ठार झाली. साकेडी रेल्‍वे फाटकापासून काही अंतरावर दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर धडक बसलेले एक जनावर पुन्हा रेल्‍वे ट्रॅकवर आल्याने मडगावकडे जाणारी जनशताब्‍दी एक्‍स्प्रेस २० मिनिटे खोळंबली होती. साकेडी परिसरात यापूर्वीही रेल्‍वेची धडकेत अनेक पाळीव जनावरे दगावली आहेत.
आज दुपारी दोनच्या सुमारास केरळ ते गुजरात जाणारी कोचिवली एक्‍स्प्रेस साकेडी रेल्‍वे फाटकापासून काही अंतरावर आल्‍यानंतर अचानक तीन जनावरे रेल्‍वे ट्रॅकवर आली. रेल्‍वे इंजिनाच्या धडकेत तिन्ही जनावरे ट्रॅकबाहेर फेकली गेली आणि दगावली. धडक बसलेली एक गाय तडफडत पुन्हा रेल्‍वे ट्रॅकवर येऊन कोसळली. दुपारी दोनच्या दरम्‍यान मुंबई ते मडगाव जाणाऱ्या जनशताब्‍दी एक्‍स्प्रेस इंजिन चालकाला साकेडी रेल्वे फाटकपासून काही अंतरावर मृत जनावर दिसले. त्‍यानंतर चालकाने प्रसंगावधान राखून रेल्‍वेचा वेग कमी केला आणि मृत जनावरापासून अवघ्या १०० फूट अंतरावर एक्‍स्प्रेस थांबली. यानंतर रेल्‍वे चालक, गार्ड तसेच साकेडीतील स्थानिकांनी एकत्र येऊन ट्रॅकवर असलेले जनावर बाजूला गेले. यानंतर वीस मिनिटे खोळंबलेली जनशताब्‍दी एक्‍स्प्रेस कणकवली स्थानकाच्या दिशेने रवाना झाली.
----------
चौकट
वारंवार त्याच ठिकाणी अपघात
दोन वर्षांपूर्वी याच परिसरात येथील शेतकऱ्यांच्या सहा म्हैशी दिवा पॅसेंजर एक्‍स्प्रेस इंजिनाखाली आल्‍याने दगावल्‍या होत्या. यानंतर तीन महिन्यांपूर्वीही याच परिसरात रेल्‍वे इंजिन धडकेत दोन बैल आणि एक गाय अशी तीन जनावरे दगावली होती तर आजच्या घटनेत दोन गाय आणि एक बैल दगावला.
----------
चौकट
तारेच्या कुंपणाची मागणी
साकेडी-बौद्धवाडी परिसरातील रेल्वे मार्गावर सातत्याने रेल्‍वे इंजिनला धडकून जनावरे दगावत आहेत. पूर्वी रेल्‍वे दुतर्फा तारेचे कुंपण असल्‍याने जनावरे रेल्‍वे मार्गावर येत नव्हती. मात्र, काही ठिकाणी कुंपण नसल्‍याने जनावरे थेट रेल्‍वे मार्गावर येत आहेत. त्‍यामुळे कोकण रेल्‍वेने आवश्‍यक त्‍या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच तारांचे कुंपण घालावे, अशीही मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82153 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..