आलिशान मोटारीतून दारु नेणाऱ्यास पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आलिशान मोटारीतून दारु नेणाऱ्यास पकडले
आलिशान मोटारीतून दारु नेणाऱ्यास पकडले

आलिशान मोटारीतून दारु नेणाऱ्यास पकडले

sakal_logo
By

आलिशान मोटारीतून
दारु नेणाऱ्यास पकडले
दाणोलीत कारवाई; सहा लाखाचा ऐवज जप्त

बांदा, ता. २९ ः आलिशान मोटारीमधून बेकायदा दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पुणे येथील एकाला आज दाणोली-बावळाट तिठ्यावर अटक केली. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला त्यांनी ओटवणे येथे चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला दाणोली तिठ्यावर असलेल्या पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. सुशांत नितीन पुरोहित (वय ३३, रा. सदाशिवपेठ-पुणे), असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून १७ हजाराच्या दारूसह ६ लाख रूपयाची मोटार असा मिळून ६ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क व सिंधुदुर्ग वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज पहाटे पाच वाजता ही कारवाई केली.
अधिक माहिती अशी की, गोव्यावरून आंबोलीच्या दिशेने बेकायदा दारू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाचे दुय्यम निरीक्षक श्री. कासकर, श्री. राणे व अन्य सहकाऱ्यांनी ओटवणे येथे सापळा रचला होता. परंतु, त्या ठिकाणी चकवा देऊन संशयित पुरोहित हा दाणोलीच्या दिशेने पळून गेला. त्यानंतर बावळाट दाणोली तिठ्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्याला अडविले. यावेळी गाडीची तपासणी करीत असताना मागून राज्य उत्पादन शुल्कचे पथक दाखल झाले. यावेळी तपासणीत गाडीत सतरा हजार रुपयाची दारू मिळून आली. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस विलास नर, प्रवीण सापळे, अजित घाडी, प्रशांत आरोलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82154 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top