जि. प. शाळांच्या विध्यार्थ्यात 1400 नी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जि. प. शाळांच्या विध्यार्थ्यात 1400 नी वाढ
जि. प. शाळांच्या विध्यार्थ्यात 1400 नी वाढ

जि. प. शाळांच्या विध्यार्थ्यात 1400 नी वाढ

sakal_logo
By

जि. प. शाळांच्या विद्यार्थी संख्येत १४०० नी वाढ

शैक्षणिक दर्जा उंचावला; कोरोनातही शिक्षण अखंड


रत्नागिरी, ता. ३० ः शैक्षणिक दर्जा, पायाभूत सुविधांसह इंग्रजी माध्यमांकडील कल वाढू लागल्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा पट घसरत होता. मागील दोन वर्षात मोकळा श्वास, पहिलं पाऊल, रत्नागिरीचा भास्कराचार्य, शिष्यवृत्ती व सराव परीक्षांवर दिलेले लक्ष, जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान, रत्नागिरी टॅलेंट सर्च यासारख्या शैक्षणिक उपक्रमांमुळे दर्जा सुधारत असून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होत आहे. त्याचा फायदा पटवाढीसाठी झाला असून दोन वर्षात अधिक चौदाशे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळाना पसंती दिली आहे.
जिल्हा परिषद शाळांचा पट दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र मागील काही वर्षात दिसत होते. त्यावर मात करण्यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांबरोबरच शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले होते. कोविड कालावधीत इंटरनेटच्या माध्यमातूनही अध्ययनाचे पर्याय उपलब्ध करून दिले तर इंटरनेट सुविधा नव्हती तेथे शिक्षकांनी स्वत: विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. १ ली ते ८ वी साठी स्वत:च्या स्वाध्याय पुस्तिका कमी कालावधीत सर्वदूर पोहोच केल्या. त्याचा फायदा जिल्हा परिषद शाळांचा पट वाढीला झाला. शैक्षणिक दर्जा, भौतिक सुविधा व अन्य सोई सवलतीमुळे मुलांचा कल वाढत आहे. पट टिकविण्यासाठी पहिले पाऊल, शाळा पूर्व तयारी मेळावे, स्वाध्याय उपक्रम, गणवेश, पाठ्यपुस्तक असे उपक्रम परिणामकारकपणे राबविले जात आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढ, शिष्यवृत्तीचा चांगला निकाल, सेमी इंग्रजी वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे सुजाण पालकांचा जिल्हा परिषद शाळांमध्ये ओढा वाढत चालला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी गुणवत्ता व दर्जा वाढीसाठी विशेष लक्ष दिले होते. २०२२ चा नवोदयचा निकालातही ८० विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांचेच निवडले गेले. २०२०-२१ या वर्षात अडीच हजार शाळांमध्ये ७१ हजार ८१० पट होता. त्यात वाढ झाली असून २०२१-२२ या वर्षात ७३ हजार २३१ पट आहे.

---
चौकट

६३ स्थलांतरित, ४ शाळाबाह्य

मिशन झिरो ड्रॉप आऊट मोहीम ५ ते २० जुलै या कालावधीत यशस्वी केली. ३ते १८ वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात आढळलेल्या ४ मुलांना जवळच्या शाळेत दाखल करून घेण्यात आले. हंगामी कामासाठी बरीच कुटुंबे ठराविक काळात जिल्ह्यात येतात. त्यांच्या सोबत ६ ते १८ वयोगटांतील मुलेही असतात. सर्वेक्षणात ६३ मुले स्थलांतरित असल्याचे दिसले. त्यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणले गेले. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक, नेपाळ येथील मुलांचा समावेश आहे. तर ४५ मुले रत्नागिरी जिल्ह्यातून अन्य ठिकाणी स्थलांतरित झाली आहेत.

---
चौकट

मागील दोन वर्षाचा पट तालुका
तालुका* २०२०-२१* २०२१-२२
मंडणगड* ३६२५* ३६४२
* दापोली* ७८४३* ८०५५
* खेड* ७३९१* ७४१८
* चिपळूण* ९७९७* ९९८८
* गुहागर* ७०८४* ७२६४
* संगमेश्वर* ९२९०* ९५४१
* रत्नागिरी* ११४४९* ११७८०
* लांजा* ६६०६* ६६८६
* राजापूर* ८७२५* ८८५७
------------------------------------------------
एकूण* ७१८१०* ७३२३१

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82165 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top