निबंध लेखन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निबंध लेखन स्पर्धा
निबंध लेखन स्पर्धा

निबंध लेखन स्पर्धा

sakal_logo
By

निबंध लेखन स्पर्धा
सावंतवाडी ः भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत श्रीराम वाचन मंदिरातर्फे निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.निबंध लेखन स्पर्धेकरिता स्पर्धकांनी पुढीलपैकी एका विषयावर आपला निबंध पाठवावा. निबंध सुवाच्च अक्षरात वा टंकलिखित डीटीपी स्वरूपात पाठवावा. निबंध लेखकांनीही आपले निबंध सुवाच्च अक्षरात वा डीटीपीस्वरूपात ११ ऑगस्टपर्यंत ग्रंथपाल श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या पत्त्यावर पाठवावेत. निबंधाचे विषय ः १) स्वातंत्र्य चळवळीत कोकणचे योगदान. २) स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांचे योगदान. ३) स्वातंत्र्य रक्षणात माझी भूमिका. ४) स्वातंत्र्याची पंचाहत्तरी. निबंध साधारणतः १००० ते १२०० शब्द मर्यादेत असावा. शक्यतोवर निबंधात वापरलेले संदर्भस्त्रोत निबंध खाली नमूद करावेत. पारितोषिके ः प्रथम क्रमांक ७०१ रुपये, द्वितीय ६०१ रुपये आणि तृतीय ५०१ रुपये. स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील. सहभाग दर्शवून सहकार्य करावे, असे आवाहन श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर व कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.
------
मळगावात ‘आशिर्वाद गुरूमाऊलीचा’
सावंतवाडी ः मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालयात रविवारी (ता.३१) दुपारी २ वाजता जगदंब संगीत विद्यालय संचालक तबला आणि पखवाज विशारद रूपेश पोवार यांच्या विद्यालयाचा ''आशिर्वाद गुरूमाऊलीचा'' हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मळगावातील कीर्तन विशारद शेखर पाडगावकर, खानोलकर मंगल कार्यालयाचे मालक सुधिर भागवत उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी संगीत प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यालयाच्या शिष्य वृंदांकडून करण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थाच्या सोलो वादनाने होणार आहे. त्यानंतर नवोदित भजनी बुवांचे गायन, वादन होणार आहे. त्यानंतर गुरुपूजन करण्यात येणार आहे. गुरुपूजनानंतर नादमृदूंगाचा हा कार्यक्रम होणार आहे.
---
आजपासून मार्गदर्शन वर्ग
सावंतवाडी ः बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयातर्फे उद्यापासून (ता.३०) एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड चित्रकला परीक्षा मार्गदर्शन वर्गांचे आयोजन केले आहे. हे मार्गदर्शन वर्ग दर रविवारी (ता.३१) संध्याकाळी ३ ते ५ या वेळेत महाविद्यालयात चालविले जातील. यासाठी महाविद्यालयातील तज्ज्ञ शिक्षकांतर्फे मार्गदर्शन केले जाईल. शासनाच्या धोरणानुसार इंटरमिजीएट परिक्षेत मिळालेल्या ग्रेडनुसार शालांत परिक्षेत अतिरीक्त गुणांचा समावेश करण्यात येतो. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82187 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..