अनिष्ट विधवा प्रथा बंदीची खारेपाटणात अंमलबजावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिष्ट विधवा प्रथा बंदीची खारेपाटणात अंमलबजावणी
अनिष्ट विधवा प्रथा बंदीची खारेपाटणात अंमलबजावणी

अनिष्ट विधवा प्रथा बंदीची खारेपाटणात अंमलबजावणी

sakal_logo
By

अनिष्ट विधवा प्रथा बंदीची
खारेपाटणला अंमलबजावणी

जिल्ह्यात ठरली पहिली ग्रामपंचायत

सकाळ वृत्तसेवा
खारेपाटण, ता. २९ ः विधवा प्रथा बंद करण्याच्या क्रांतिकारी निर्णयाचे देशभरातून स्वागत होत असताना पंच सदस्य, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून खारेपाटण शहरात विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाची प्रथम अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे अनिष्ट विधवा प्रथा बंद कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी खारेपाटण ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
पतीचा मृत्यू झाल्यावर मंगळसूत्र काढणे, कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे आदी कुप्रथा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. सिंधुदुर्गातील ९० टक्‍केपेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी याबाबतचे ठराव देखील केले. खारेपाटणमध्ये प्रत्‍यक्ष अंमलबजावणी करून या लढ्याला आणखी बळ दिले आहे. येथील ग्रामपंचायतीचे निवृत्त कर्मचारी सुरेश जामसांडेकर (वय ६३) यांचे नुकतेच निधन झाले. त्‍यांच्या निधनानंतर येथील ग्रामपंचायत कर्मचारी बाबा शेट्ये यांनी जामसांडेकर परिवाराला विधवा प्रथा बंदीबाबतची माहिती दिली. त्‍याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते नंदू कोरगावकर, विजय देसाई, सुधीर कुबल, खारेपाटण प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांच्यासह उपस्थित तेली समाज बांधवांनीही जामसंडेकर परिवाराला काळीज पिळवटणाऱ्या विधवा प्रथा खारेपाटणमधून हद्दपार केल्‍याची माहिती दिली. गेले वर्षभर हॉस्पिटलमध्ये सुरेश जामसांडेकर यांची सेवा करणाऱ्या त्‍यांच्या पत्‍नी शुभांगी यांनीही या निर्णयाचा स्वीकार केला. त्यामुळे अघोरी प्रथांना सिंधुदुर्गात खारेपाटणमध्ये सर्वप्रथम तिलांजली मिळाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82264 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top