ठाकरेंचे विमानतळावर भव्य स्वागत करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरेंचे विमानतळावर भव्य स्वागत करणार
ठाकरेंचे विमानतळावर भव्य स्वागत करणार

ठाकरेंचे विमानतळावर भव्य स्वागत करणार

sakal_logo
By

39577
कणकवली : येथील शिवसेना कार्यालयात आदित्‍य ठाकरे यांच्या दौरा नियोजनाची झालेली बैठक.

ठाकरेंचे विमानतळावर
भव्य स्वागत करणार
सुशांत नाईक : कणकवलीत नियोजन बैठक

कणकवली, ता.३० : युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे हे १ ऑगस्टला सिंधुदुर्गात येत आहेत. त्‍यांचे चिपी विमानतळावर भव्य स्वागत केले जाणार आहे. त्‍यानंतर त्‍यांच्या दौऱ्यात कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती जिल्‍हा युवा सेना प्रमुख सुशांत नाईक यांनी दिली.
आदित्‍य ठाकरे यांच्या नियोजनाची बैठक येथील शिवसेना कार्यालयात झाली. त्‍यानंतर याबाबतची माहिती सुशांत नाईक यांनी दिली. त्‍यांच्यासोबत उपतालुकाप्रमुख राजू राणे, नगरसेवक कन्हैया पारकर, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, समन्वयक राजू राठोड, ॲड. चेतन पाटील, उत्तम लोके, राजन म्हाडगुत, उत्तम सावंत, शहरप्रमुख आदित्य सापळे, विलास गुडेकर, तेजस राणे, शरद सरगले, महेश कोदे, विश्राम सावंत, व्यंकटेश वारंग आदी उपस्थित होते.
--
39547
आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे उद्या जिल्ह्यात
कुडाळ ः शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी (ता. १) निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. सकाळी अकराला कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. तर दुपारी बाराला सावंतवाडी येथील गांधी चौक येथे ठाकरेंची जाहीर सभा होणार असून या सभेला ते संबोधित करणार आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी ही माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82292 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..