
देवरूख ः पाटगाव येथे घरावर कोसळली वीज
-rat३०p१८.jpg
39575
ः देवरूख ः वीज पडल्यामुळे मेतर यांच्या घरातील मीटर जळला आहे.
---------
पाटगाव येथे घरावर कोसळली वीज
देवरूख, ता. ३० ः देवरूखनजीकच्या पाटगाव कुंभारवाडी येथे घरावर वीज कोसळून भिंतीला तडे जाण्याबरोबर विद्युत उपकरणे जळण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. २८) सायंकाळी ५ वा. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. विजांचा कडकडाट एक तास सुरू होता. ५ वाजण्याच्या सुमारास पाटगाव येथील जयराम मेतर यांच्या घरावर वीज कोसळण्याचा प्रकार घडला. यामध्ये मेतर यांच्या घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. तसेच विद्युत उपकरणे जळाली आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेचा पंचनामा शुक्रवारी (ता. २९) तलाठी अमर चाळके, सरपंच विजय कुंभार, देवेंद्र गवंडी यांनी केला. मेतर यांचे २५ हजार रुपये नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
--------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82311 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..