
स्वच्छ चारित्र्याचा कर्तबगार अधिकारी
जाहिरात लेख
swt३०१४.jpg
३९५९२
ग्रामविकास अधिकारी मधुकर घाडी
swt३०१५.jpg
३९५९३
पत्नी श्वेता, मुलगा आशुतोष, मुलगी मिताली यांच्यासोबत.
swt३०१६.jpg
३९५९४
सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना.
...............
पानाचे डोके -
ग्रामविकास अधिकारी मा. मधुकर घाडी सेवानिवृत्ती विशेष
स्वच्छ चारित्र्याचा कर्तबगार अधिकारी
लीड
गावाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून तेथील ग्रामस्थांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी कायम सकारात्मक काम करणारे निरवडे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व कुडाळ तालुक्यातील आकेरी गावचे सुपुत्र मधुकर तातोबा घाडी हे रविवारी (ता. ३१ जुलै) सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या ३२ वर्षांच्या काळात सावंतवाडी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींमध्ये सेवा बजावली. अनेक विकासकामांत योगदान दिले. असा निष्कलंक आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा सर्वसामान्य अधिकारी सेवानिवृत्त होत आहे. यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा...
- निखिल माळकर
.................
मधुकर घाडी यांची काम करण्याची पद्धत, निर्णयक्षमता, संयमीपणा, पारदर्शकता, कार्यतत्परता, संवेदनशीलता अन् कुशल कार्यपध्दतीतून ३२ वर्षे शासकीय सेवेतील टप्पा पार पडला; मात्र इतका दीर्घकाळ अंगाला एकही भ्रष्टाचाराचा डाग न लागू देता काम करू शकतो, हेही त्यांनी दाखवून दिले. ज्या गावात नेमणूक झाली, त्या ठिकाणचा विकास झाला पाहिजे, हा ध्यास घेत त्यांनी निरवडेत ग्रामविकास अधिकारी असताना अनेक सकारात्मक निर्णय घेतले. गेल्या काही वर्षांत रखडलेली कामे पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यात ग्रामपंचायत प्रशासनासोबत सरपंच, सदस्य यांचीही त्यांना मोलाची साथ लाभली.
श्री. घाडी यांना गायनाचा छंद तसेच क्रिकेट खेळण्याची आवड आहे. आकेरी येथे त्यांचे बालपण गेले. तेथेच प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. सावंतवाडीत राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये बारावी कॉमर्सपर्यंत शिक्षण पूर्ण करून दापोली कृषी विद्यापीठात कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तेथे कृषी पदविका प्राप्त झाल्यानंतर ग्रामसेवक म्हणून २८ मार्च १९९० ला घावनाळे-तुळसुली ग्रामपंचायतीपासून सुरुवात केली.
सावंतवाडी आणि कुडाळ या दोन तालुक्यांत ग्रामीण भागात ग्रामसेवक म्हणून कुणकेरी, आंबेगाव, कोलगाव, चराठा, माडखोल, कलंबिस्त, शेर्ले, निरवडे, वेंगुर्ले तालुक्यातील आडेली, कुसेवाडा, म्हापण आदी भागात ग्रामसेवक म्हणून त्यांनी काम केले. निरवडे, आडेली, आंबेगाव येथील ग्रामपंचायत इमारत उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. २००७-०८ मध्ये त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त झाला. सावंतवाडी तालुका ग्रामसेवक युनियनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. या काळात ग्रामसेवकांच्या समस्या, अडचणी शासनस्तरावरून सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
निरवडे ग्रामपंचायतीमध्ये २००६-०७ मध्ये ग्रामसचिवालय उभारणीच्या कामात त्यांचा मोठा वाटा आहे. या गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय क्रमांक प्राप्त करून देण्यासह निरवडे गावात रोजगार हमी योजनेचे उल्लेखनीय काम त्यांनी केले. निरवडे गावाच्या रचनेनुसार प्रत्येक वाडीत विकासात्मक दृष्टीने सरपंच, सदस्यांशी चर्चा करून एक विकासाचा आराखडा बनवून गावाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे कामही त्यांनी केले. निरवडे गावात त्यांनी ग्रामसेवक म्हणूनही काम केले होते. या सेवानिवृत्तीपर्यंतच्या कालावधीत ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजावत आपल्या सेवेचा शेवटही याच गावातून त्यांनी केला. श्री. घाडी यांनी निरवडे गावाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीने मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी गावातील लोकांना आपलेसे करून टाकले. सेवानिवृत्त झाले तरी ते आपल्यातच राहावेत, अशी इच्छा निरवडेवासीयांची आहे. निरवडे गावाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरण्यासारखेच आहे. त्यांच्या पत्नी श्वेता घाडी माणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका आहेत. मुलगा आशुतोष सिव्हिल इंजिनिअर, तर मुलगी मिताली हिने सेन्सर इलेक्ट्रिकल मास्टर पदवी प्राप्त केली आहे. श्री. घाडी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82317 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..