रत्नागिरी-कातळ पठारावरील दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-कातळ पठारावरील दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यास
रत्नागिरी-कातळ पठारावरील दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यास

रत्नागिरी-कातळ पठारावरील दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यास

sakal_logo
By

- rat30p21.JPG
39585
रत्नागिरी ः येथील कातळ पठारावरील दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यास करताना उपपरिसरातील विद्यार्थी.
-------------
कातळ पठारावरील दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यास

रत्नागिरी, ता. ३० ः मुंबई विद्यापीठ चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर पर्यावरणशास्त्र विभागामार्फत कातळ पठारावरील क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी संशोधक डॉ. अरुण चांदोरे, संशोधक डॉ. कुमार विनोद गोसावी व पर्यावरणशासस्त्र विभागाचे डॉ. पांडुरंग पाटील हे या सर्व क्षेत्रभेटीदरम्यान उपस्थित होते.
विभागातील एम. एस्सी. पर्यावरणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना पठारावरील वनस्पतींच्या विविध प्रजातींची सखोल माहिती देण्यात आली. यानिमित्ताने उपपरिसराचे सहायक कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांच्या हस्ते पठारावर वृक्षारोपण करण्यात आले. तसेच नव्याने शोध घेण्यात आलेल्या वनस्पतींचा संशोधनात्मक अभ्यास करण्याकरितांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले. विविध प्रजातींचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून त्यांचा समाजोपयोगी कार्याकरिताचा वापर होण्याचे मत उपस्थितांद्वारे व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण प्रदान करणे व त्यांना वैज्ञानिक संशोधनास सक्षम करणे असे भाव सहायक कुलसचिव अभिनंदन बोरगावे व प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी व्यक्त केले.

.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82341 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..