नानासाहेब उर्फ जगन्नाथ शंकरशेठः मुंबईचे अनभिषिक्त शिल्पकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानासाहेब उर्फ जगन्नाथ शंकरशेठः मुंबईचे अनभिषिक्त शिल्पकार
नानासाहेब उर्फ जगन्नाथ शंकरशेठः मुंबईचे अनभिषिक्त शिल्पकार

नानासाहेब उर्फ जगन्नाथ शंकरशेठः मुंबईचे अनभिषिक्त शिल्पकार

sakal_logo
By

नानासाहेब उर्फ जगन्नाथ शंकरशेटः मुंबईचे अनभिषिक्त शिल्पकार

सामान्य माणसाच्या उद्धारासाठी आपल्या संपत्तीची खरी गरज आहे, हे लोकसेवेचे व्रत घेऊन सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सुधारणांच्या पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान नानासाहेब उर्फ जगन्नाथ शंकरशेट यांनी दिले. यासाठी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा त्यांनी दान केला आहे. त्यामुळे ते एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकाराचे जनक म्हणून दैवज्ञ समाजासह सर्व समाजाचे भूषणीय व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्धीस झाले.
-प्रसन्न विनायक मालपेकर
धोपेश्वरघाटी, राजापूर

१८०३ ते १८६५ लोकसेवेचे व्रत घेऊन सामाजिक सुधारणांच्या पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारी दैवज्ञ ब्राह्मण, सोनार, नानासाहेब उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावी झाला. त्यांचे वडील व्यापारानिमित्त मुंबईत आले. म्हैसूरच्या १७९९च्या टिपू इंग्रज युद्धात त्यांच्या वडिलांना अमाप पैसा मिळाला. नानांचे वडील सन १८२२ मध्ये निवर्तले. तरुणपणीच नानांवर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी येऊन पडली. त्यानुसार त्यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा, लोककल्याणकारी सुधारणांचा पाया रचला.
अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी म्हणून नावलौकिक प्राप्त केला. तत्कालीन अरब व अफगाणी तसेच इतर परदेशी व्यापारी यांनी भारतातील मालमत्ता बँकांकडे सुपूर्द न करता ती शंकरशेठ यांच्याकडे सोपवली. नानांचे बालपण हे अतिशय संपन्नतेत व्यतीत झाले; मात्र सामान्य माणसाच्या उद्धारासाठी आपल्या संपत्तीची खरी गरज आहे, हे लोकसेवेचे व्रत घेऊन सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सुधारणांच्या पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देताना स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला आहे. त्यामुळे ते एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकाराचे जनक म्हणून दैवज्ञ समाजासह सर्व समाजाचे भूषणीय व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्धीस झाले.
शैक्षणिक संस्था, विधी महाविद्यालये आणि मेडिकल कॉलेज यांची स्थापना करून शिक्षणाची सोय केली. यातून त्यांचे समाजकार्य किती मोठं आहे याची प्रचिती येते. ते एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून समाजोपयोगी कार्यासाठी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेकांना देणग्या दिल्या व दानधर्म केले. त्यांच्या अथक प्रयत्नातून १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे ही आशिया खंडातील पहिली रेल्वे सुरू करण्यात आली. त्यामुळे त्यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. मुंबई महानगरपालिका परिसरात आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव, नाट्यगृहे, स्मशानभूमी अशी विविध कामे त्यांनी केली. त्यांचे समाजाभिमुख काम पाहिले असता ते समाजसुधारक म्हणून एक उत्तम नेतृत्व करणारे असे हे भव्यदिव्य व्यक्तिमत्त्व होते. अशा या थोर महनीय नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेट यांना ३१ जुलै १८६५ रोजी देवाज्ञा होऊन ते अनंतात विलीन झाले असले तरी ते अमरत्वाने आजही सर्वांच्या हृदयामध्ये चिरंतर स्मरणात राहिले आहेत. आज त्यांचा स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82347 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..