रत्नागिरी- संक्षिप्त ः क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त ः क्राईम पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त ः क्राईम पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त ः क्राईम पट्टा

sakal_logo
By

दुकान फोडून १४ हजार रोख पळवले
रत्नागिरी ः शहरातील आठवडा बाजार येथील दुकानाच्या जाळीचे कुलूप तोडून चोरट्याने दुकानातील गल्ल्यातील १४ हजार रुपयांची चोरी केली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २८ ते २९ जुलै सकाळी साडेसातच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजीव भरत रसाळ (वय ५६, रा. आत्मबंधू प्लाझा, रहाटाघऱ बसस्टॅण्ड शेजारी रत्नागिरी) यांच्या आठवडा बाजार येथील भागिर्थी जनरल स्टोअर्स दुकानाच्या जाळीचे कुलूप चोरट्याने धारदार हत्याराने तोडून आत प्रवेश केला व दुकानाच्या गल्ल्यातील १४ हजार रुपयांची रोख रक्कम पळवली. याप्रकरणी संजीव रसाळ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
-------
ग्रामसेवकाला जामीन मंजूर
रत्नागिरी ः राजापूर तालुक्यातील परुळे येथील ग्रामसेवकाला लाच घेताना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला १५ हजारांचा जामीन मंजूर केला. संजय बबन दळवी असे संशयित ग्रामसेवकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २७) घडली. तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले होते. या विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार परुळे गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या घराचा आजोबांच्या नावावरील असेसमेंट उतारा वडिलांच्या नावावर करायचा होता; मात्र ग्रामसेवकाने त्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. दळवी यांच्या वतीने अॅड. निनाद शिंदे यांनी न्यायालयापुढे जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82353 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top