
फसवणूक झालेल्यांना मोठा आधार
39636
कणकवली : येथील नगराध्यक्ष दालनात फसवणूक झालेल्या युवक-युवतींना रक्कम परत करण्याची सुरू केलेली कार्यवाही.
फसवणूक झालेल्यांना मोठा आधार
रक्कम मिळणार मागे; कणकवलीत नगराध्यक्षांच्या दालनात बैठक
कणकवली, ता.३० : डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि तालुका समन्वयक पद भरतीच्या आमिषाने सिंधुदुर्गातील तब्बल ११२ युवक-युवतींकडून कोल्हापूरच्या त्रिकुटाने पैसे उकळले होते. फसवणूक झालेल्या सर्व युवक युवतींना त्यांचे प्रत्येकी पाच हजार रूपये मागे देण्याची कार्यवाही आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या दालनात सुरू झाली. दोन दिवसांत सर्व युवक-युवतींना त्यांचे पैसे परत दिले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
सिंधुदुर्गातील कसाल येथील एका संस्थेकडे जिल्ह्यातील युवक - युवतींनी रक्कम जमा केली होती. तर या संस्थेने पाच हजार पैकी तीन हजाराची रक्कम कोल्हापूर येथील घुले नामक व्यक्तीच्या खात्यावर पाठवली होती. फसवणुकीच्या प्रकरणाचा नगराध्यक्ष नलावडे यांनी पर्दाफाश केल्यानंतर घुले व्यक्तीने त्याच्या खात्यावर आलेले ११२ जणांचे प्रत्येकी तीन हजार रूपये कसाल येथील त्या संस्थेच्या नावे परत पाठवले. तर कसाल येथील संस्थेने जिल्ह्यातील युवक-युवतींना प्रत्येकी पाच हजार रूपये परत देण्याची कार्यवाही नगराध्यक्ष दालनात सुरू केली. यात आज कणकवली आणि वैभववाडी तालुक्यातील युवक युवतींना त्यांचे पाच हजार रूपये मागे देण्यात आले.
---
स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणार
नगराध्यक्ष दालनात आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासोबत भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कसाल येथील संस्थेचे अनिल शिंगाडे आणि फसवणूक झालेले युवक-युवतींची बैठक झाली. दोन दिवसांत उर्वरित उमेदवारांनाही रक्कम अनिल शिंगाडे यांच्या मार्फत दिली जाणार आहे. तसेच या युवतींना नगरपंचायतीमार्फत स्वयंरोजगार आणि उद्योगाबाबतचे प्रशिक्षण देणार असल्याचे नलावडे म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82390 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..