
शास्त्रीय संगीतात दबदबा निर्माण करा
39645
कणकवली : गुरूपौर्णिमा कार्यक्रमात बोलताना वामन पंडित. शेजारी पं.समीर दुबळे, सुजाता जोशी आदी.(छायाचित्र : अनिकेत उचले)
शास्त्रीय संगीतात दबदबा निर्माण करा
वामन पंडित : आचरेकर प्रतिष्ठानमध्ये ‘गुरुपौर्णिमा’
कणकवली, ता.३० : पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं. समीर दुबळे हे आपल्या गुरूंच्या शास्त्रीय संगीताच्या ज्ञानाचा वसा पुढे नेण्याचे काम करीत आहेत. त्याच धर्तीवर पं. समीर दुबळे यांच्या शिष्यांनीही शास्त्रीय संगीतामध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करावा, असे आवाहन वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित यांनी केले.
शहरातील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षण केंद्रामध्ये आज गुरूपौर्णिमा कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. उद्घाटन प्रसंगी वामन पंडित बोलत होते. यावेळी पंडित समीर दुबळे, सुजाता जोशी, प्रादेश जोशी, बाळ नाडकर्णी, प्रतिष्ठानचे कार्यवाह नानू देसाई, सदस्य लीना काळसेकर, प्रसन्ना देसाई, मिलिंद बेळेकर आदी उपस्थित होते.
पं. दुबळे यांनी १५ वर्षांपूर्वी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सहकार्यातून सिंधुदुर्गातील संगीतप्रिय विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे देण्यास सुरुवात केली होती. त्यातूनच पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राची स्थापना झाली. या केंद्राच्या माध्यमातून संगीत क्षेत्राची आवड असलेले विद्यार्थी शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात दामोदर खानोलकर, सीमा कोरगावकर, किरण गायकवाड, रविराज काळे, संतोष देशमुख, उमेश परब, ऋषा कशाळीकर, डॉ. समीर नवरे, विश्रांती कोयंडे, मनोज मेस्त्री, ईश्वरी तेजम यांनी गायन सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. शरद सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82404 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..