पा ३ फोटो कॅप्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पा ३ फोटो कॅप्शन
पा ३ फोटो कॅप्शन

पा ३ फोटो कॅप्शन

sakal_logo
By

रघुवीर घाट पुन्हा बंद...
रत्नागिरीः रघुवीर घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे रघुवीर घाटाच्या पलीकडच्या कांदाटी खोऱ्यातील २१ गावांचा संपर्क तुटला आहे. ही दरड बाजूला करताना पुन्हा त्याचठिकाणी दरड कोसळल्याने हे काम थांबले. दरड हटविण्याचे काम रविवारी (ता.३१) पुन्हा सुरू करणार आहे. दरड कोसळल्याची माहिती शनिवारी (ता.३०) सकाळी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी जेसीबीसह अन्य सामुग्री घेऊन बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे आकल्पे येथे वस्तीला असलेली आकल्पे-खेड ही एसटी बस पलीकडे अडकून पडली. त्यामुळे आज कामानिमित्त खेड शहरात येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मुसळधार पावसामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने हा घाट १ जुलैपासूनच दोन महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंदच ठेवण्यात आला आहे.
...
rat30p16.jpg ः
39573
रघुवीर घाटाच्या पलीकडे अडकलेली खेड आगाराची आकल्पे-खेड एसटी बस.
-rat30p26.jpg ः
39625
दरड काढायचे काम सुरू असताना पुन्हा दरड कोसळल्याने अडकलेली एसटी.
-rat30p27.jpg ः
39626
जेसीबीद्वारे दरड हटविण्याचे काम सुरू आहे.
..

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82417 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..