निष्ठावानांची ताकद दाखवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निष्ठावानांची ताकद दाखवा
निष्ठावानांची ताकद दाखवा

निष्ठावानांची ताकद दाखवा

sakal_logo
By

39656
वेंगुर्ले ः शिवसेनेच्या बैठकीत मार्गदर्शन करताना यशवंत परब. शेजारी इतर.

निष्ठावानांची ताकद दाखवा

यशवंत परब ः वेंगुर्लेत शिवसेनेची बैठक

वेंगुर्ले, ता. ३० ः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निष्ठावान शिवसेनेची जी ताकद आहे, ती दाखविण्याची वेळ आली आहे. यासाठी शिवसेना पक्षावरील निष्ठावान शिवसैनिकांनी १ ऑगस्टला होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केले आहे.
माजी पर्यटनमंत्री, शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे १ ऑगस्टला निष्ठा यात्रेनिमित्त सावंतवाडी येथे येत आहेत. यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील या सभेला उपस्थित राहण्यासंदर्भात आज तालुका शिवसेनेची नियोजन बैठक येथील शाखेत झाली. यावेळी विभागनिहाय गाड्यांचे नियोजन करून जास्तीत जास्त कार्यकर्ते व शिवसैनिक सावंतवाडीतील सभेला उपस्थित राहण्याचा निर्धार करण्यात आला. तालुकाप्रमुख परब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सचिन देसाई, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, शहर समन्वयक विवेक आरोलकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी नगरसेवक तुषार सापळे, वायंगणी सरपंच सुमन कामत, संजय गावडे, श्रीकांत घाटे, संजय परब, उमेश नाईक, मनोहर येरम, नेहा साळगावकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82421 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..