पावसाची विश्रांती, शेतकामे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाची विश्रांती, शेतकामे सुरू
पावसाची विश्रांती, शेतकामे सुरू

पावसाची विश्रांती, शेतकामे सुरू

sakal_logo
By

कोरोनाचे नवे
पाच रुग्ण
ओरोस ः जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे ५ नवे रुग्ण आढळले. तर १ रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ७२ राहिली. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कणकवली १, सावंतवाडी १, वैभववाडी १, वेंगुर्ले १, जिल्ह्याबाहेरील १ असा समावेश आहे. आज एकूण १६२ नमुने तपासण्यात आले. सक्रिय रुग्ण ७२ असून यात देवगड ५, दोडामार्ग ११, कणकवली १३, कुडाळ १२, मालवण ५, सावंतवाडी ११, वैभववाडी २, वेंगुर्ले १० व जिल्ह्याबाहेरील २ आहेत. हे सर्व होम आयासोलेटेड आहेत. आतापर्यंत एकूण सहा लाख ४६ हजार १०० कोरोना चाचण्या जिल्ह्यात झाल्या.
...................
देवगडात १३ला
वक्तृत्व स्पर्धा
देवगड ः येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. १३ ऑगस्टला दुपारी चारला स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात ही स्पर्धा होईल. ‘माझ्या स्वप्नातील समृद्ध भारत’ हा स्पर्धेचा विषय आहे. स्पर्धेसाठी पाच मिनिटांचा कालावधी असेल. पहिल्या तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देण्यात येणार आहेत. तसेच दोन उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देण्यात येईल. इच्छुकांनी ११ ऑगस्टपर्यंत ग्रंथालयात नावे द्यावीत, असे आवाहन ग्रंथालय अध्यक्ष सागर कर्णिक यांनी केले.
.......................
फोंडाघाट येथे
शेतकामे सुरू
फोंडाघाट ः येथील परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने दोन दिवसांपासून सूर्य दर्शन होत आहे. पावसाने आपला जोर कमी केल्याने भात लावणी सोबत, उडीत, भूईमुग, भाजीपाला लागवड सुरू झाली आहे. भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. श्रावण मास सुरू झाल्याने शेतकरी आता शेतातील तन वेचनीच्या कामाला लागणार आहेत. पावासचा जोर कमी झाल्याने शिवरातील पाणी कमी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
---
हळवल येथे
गव्यांचा उच्छाद
कणकवली ः हळवल (ता.कणकवली) आणि परिसरात पुन्हा एकदा गव्यांच्या कळपाने हजेरी लावली आहे. वनविभागाने या कळपाला गावाबाहेर हुसकावण्याचा प्रयत्न केला; मात्र, हा कळप सध्या शिरवल, कळसुली, कसवण परिसरात ठाण मांडून आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. शेतीचे नुकसान होत आहे. भरपाई मिळात नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82526 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..