रिक्षा संघटना आंदोलनास जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा संघटना आंदोलनास  
जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा
रिक्षा संघटना आंदोलनास जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा

रिक्षा संघटना आंदोलनास जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा

sakal_logo
By

L39750

ओळ - इर्शाद शेख

रिक्षा संघटना आंदोलनास
जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा
इर्शाद शेख ः इंधन दरवाढीस केंद्र जबाबदार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. 31 ः सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने सी.एन.जी. गॅस, पेट्रोल, डिझेलच्या भरमसाठ दरवाढीविरोधात उद्या (ता. 1) आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकारने इंधनावर लावलेल्या भरमसाठ करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांना व्यवसाय करणे फार अडचणीचे झाले आहे. 2014 पर्यंत मनमोहनसिंग सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर प्रचंड वाढलेले असताना सुद्धा त्यावेळीच्या केंद्राने इंधनावरील कर कमी ठेवून इंधन दरवाढ आटोक्यात ठेवली होती. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात पेट्रोलवरील अबकारी कर 9.48 रुपये आणि डिझेलवरील अबकारी कर 3.56 रुपये होता. मोदी सरकारच्या काळात हा कर कितीतरी पटीने वाढवण्यात आला आहे. एका बाजूला हे केंद्र सरकार मोठ्या उद्योगपतींची लाखो कोटींची कर्जे माफ करत आहे, कंपन्यांवर लागणारा कॉर्पोरेट टॅक्स कमी करत आहे. तर सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून देशातील गोरगरीब जनतेला लुटण्याचे काम करत आहे.सामान्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
....................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82561 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..