मिलाग्रीस हायस्कूलमध्ये पालक दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये
पालक दिन उत्साहात
मिलाग्रीस हायस्कूलमध्ये पालक दिन उत्साहात

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये पालक दिन उत्साहात

sakal_logo
By

L३९७५४

ओळ - सावंतवाडी ः येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये पालक दिनानिमित्त उपस्थित मान्यवर.

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये
पालक दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः पालक दिनाचे औचित्य साधून मिलाग्रीस हायस्कूलमध्ये पालक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. यानंतर प्रमुख मान्यवर डॉ. प्रवीण मसुरकर व डॉ. प्राजक्ता मसुरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वैद्यकीय सेवेसोबतच आदर्श पालक भूमिका निभावणाऱ्या दोन्ही उभयतांचा यावेळी सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांच्या शुभहस्ते करण्यात आला. सिद्धी फुंदे हिने विद्यार्थ्यांमधून आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नृत्याविष्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उपस्थित पालकांना शुभेच्छा दिल्या. पालक दिनानिमित्त प्रतिज्ञा वाचन अजित नाईक यांनी केले तर शुभेच्छा कार्ड देऊन सर्व पालकांना विद्यार्थ्यानी पालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी फिलिप फर्नाडिस याने गीत गायनातून उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. शालेय शिस्त व शाळेतून विद्यार्थ्यांवर रुजविले जाणारे संस्कार यांचे कौतुक करीत डॉ. मसुरकर यांनी शाळेला धन्यवाद दिले. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक फादर सालदाना यांनी पालक दिनाच्या शुभेच्छा देत उपस्थित पालकांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अॅन्थोनेसीया फर्नांडिस यांनी तर आभार शिक्षक अजित नाईक यांनी मानले.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82562 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..