संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

-rat३०p४.jpg
39784
बाणकोटः येथे हजरत बाबुल्लाशहा यांच्या ३४६व्या उरूसनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक.
-----------
बाणकोटला बाबुल्लाशहा उरूस उत्साहात
मंडणगड ः हजरत बाबुल्लाशहा यांचा ३४६वा उरूस बाणकोट येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २४ जुलैला बाणकोट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हजरत बाबुल्लाशहा यांच्या दर्ग्यातून उरसाची मिरवणूक काढण्यात आली. तेथून संपूर्ण वाल्मिकीनगर व बाणकोट गावात फिरवून बाणकोट कस्टम ऑफिस येथे मिरवणूक समाप्त करण्यात आली. संध्याकाळी ५ वाजता गयरवी रातीब आणि रात्री १०.३० ला मजारवर संदल चढवण्यात आला. उरूस परिसरातील हिंदू- मुस्लिम बांधव मिळून साजरा करतात. या कार्यक्रमास बाणकोट ग्रामपंचायत सरपंच इस्माईल बदरूद्दीन उंडरे, बापू सोलकर, मुराद परकार, नुरूल्ला हमदुले इस्माईल हमदुले, जावेद परकार, लियाकत नाडकर, मकबुल मापकर, बकर पेवेकर, लियाकत हजवाणे यांची उपस्थित होती.
------------
rat३०p१०
39790
मंडणगडः प्रशालेत आयोजित कार्यक्रमात कैवल्य जोशी यांचा सत्कार करताना पर्यवेक्षक शांताराम बैकर व शिक्षकवर्ग.
------------
बुद्धिबळ स्पर्धेत कैवल्य जोशी तिसरा
मंडणगडः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड या विद्यालयातील सातवीमध्ये शिकणारा कैवल्य जोशी याने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून नेत्रदिपक यश संपादन केले आहे. त्याची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी, पर्यवेक्षक शांताराम बैकर व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभिनंदन केले.
---------
rat३०p१२
39782
साखरपाः विद्यार्थी आर्यन पवार याचा सत्कार करताना केंद्रप्रमुख मोहन कनावजे.
------------
किरबेट केंद्रात शिक्षण परिषद उत्साहात
साखरपा ः किरबेट केंद्रातील यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षण परिषद पार पडली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त होत असलेले साखरपा नं. २ केंद्रप्रमुख मोहन कानावजे उपस्थित होते. किरबेट सुतारवाडी या शाळेत केंद्रातील पहिली शिक्षण परिषद पार पडली. याच शाळेतील विद्यार्थी आर्यन पवार याचा विशेष सत्कार प्रमुख पाहुणे मोहन कानावजे आणि किरबेट केंद्राचे प्रमुख रामचंद्र कुवळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. अंगणवाडी मदतनीस समिता सुर्वे यांनी वयाच्या ४८व्या वर्षी शालांत परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कनावजे निवृत्त होत असल्याबद्दल त्यांचा सत्कार रामचंद्र कुवळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षण परिषदेत निपुण भारत, पायाभूत चाचण्या, विद्यांजली विद्याप्रवेश, निपुण मित्र या विषयावर विविध शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82578 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..