फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

L३९७९३

ओळ - देवगड ः माजी विद्यार्थ्यांकडून गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

देवगडात माजी विद्यार्थ्यांतर्फे
शैक्षणिक साहित्याचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
देवगडः येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या दहावीच्या १९९८-९९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. मुख्याध्यापक संजीव राऊत यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना गणवेश व वह्यांची मदत देण्यात आली.
यावेळी माजी विद्यार्थिनी शीतल वैशंपायन, स्वाती पाटणकर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या वर्गमित्रांच्या वतीने शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. ही दहावीची बॅच गेली दोन वर्षे सातत्याने शाळेशी संपर्क साधून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या लक्षात घेऊन सातत्याने ही मदत करीत आहे. शाळेविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांनी राबविलेला हा स्तुत्य उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत मुख्याध्यापक राऊत यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी पर्यवेक्षक तानाजी पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या देणगीबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
................
L३९७९४
दुर्वास गुरव

दुर्वास गुरव यांना
पुरस्कार जाहीर
देवगडः तालुक्यातील वाडा गावचे सुपुत्र भजन सम्राट दुर्वास गुरव यांची ''आर्ट बिट्स फाउंडेशन'' यांच्य़ाकडून देण्यात येणार्‍या ''आर्ट बिट्स महाराष्ट्र कला सन्मान'' या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
गुरव यांना त्यांचे आजोबा भजन सम्राट (कै.) जयराम बुवा घाडीगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या आजोळीचे संपूर्ण कुटुंब भजनाचे पाईक आहेत. त्यांचे मामा मनोहर घाडीगावकर पखवाजवादक होते. त्यामुळे लहानपणापासूनच गुरव यांना भजनाची आवड निर्माण झाली. दहावीपर्यंत गावात शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईत प्रमोद हर्याण यांच्याकडे भजनाचे शिक्षण घेतले. आता त्यांना भजन क्षेत्रातील सन्मान प्राप्त झाला आहे. यापूर्वी विविध भजन स्पर्धांमधून त्यांनी यश प्राप्त केले आहे. राज्यातील विविध १७ जिल्ह्यांमधून राज्यस्तरीय भजन स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. सध्या गुरव यांच्याकड़े सुमारे ५० शिष्य भजनाचे मोफत शिक्षण घेत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
.......................

न्हावेलीसाठी स्वतंत्र
वायरमनची मागणी
सावंतवाडी,ः गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून न्हावेली गावात नेहमी विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. वाहिन्यांना लागणारी झाडीझुडपे त्रासदायक ठरत असून वीज समस्येसंदर्भात विचारणा केली असता वायरमनकडून उध्दट उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमनची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावातील विजेसंदर्भात ठेवण्यात आलेले तक्रार पुस्तक २०१७ पासून संबंधित वायरमनने पाहिलेले नाही किंवा त्यावर तक्रार निवारण केल्याचा कोणताही उल्लेख नाही. वीजवाहिन्यांना लागणारी झुडपे प्रशासनाने सफाई न केल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याचा परिणाम नळपाणी योजनेवर होत असून भरपावसाळ्यात पाण्यासाठी महिलांना भटकावे लागत आहे. उन्हाळ्यात वाहिन्यांना लागणारी झाडीझुडपे न तोडल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजबिले वेळेवर भरूनही अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी केला आहे.
..................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82587 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..