
चिपळूण ः चिपळूणात केरोसीनचा तुटवडा
L39799 ः संग्रहीत
....
गॅस परवडेना, केरोसीनही मिळेना!
चिपळुणातील नागरिकांची आर्थिक कोंडी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ ः महागाईच्या दुष्टचक्रात अडकलेल्या चिपळूण तालुक्यातील नागरिकांची दुहेरी कोंडी झाली आहे. स्वयंपाकाचा गॅस महाग झाला असताना दुसरीकडे केरोसीनदेखील बंद आहे. गॅस नसल्याचे हमीपत्र असल्याशिवाय केरोसीन दिले जात नव्हते. आता तर मागील दोन महिन्यांपासून केरोसीन मिळत नाही.
केंद्र शासनाने गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. गॅसला पर्याय म्हणून केरोसीनचा वापर केला जातो. चिपळूण तालुक्यातील अनेक ठिकाणच्या भागात चूल पेटविणे, स्टोव्ह, दिवाबत्ती यासाठी केरोसीनचा वापर केला जातो. परंतु शासनाने गॅस जोडण्या देऊन केरोसीन विकत घेण्याचा मार्ग बंद करून टाकला होता. घरी गॅस नसल्याचे हमीपत्र सादर केल्याशिवाय केरोसीन देण्यात येत नव्हते. शासनाने जबरदस्तीने गॅस घेण्यास भाग पाडले आणि दुसरीकडे केरोसीन देण्याचा मार्ग बंद केला आहे. चिपळूणच्या पुरवठा विभागाच्या किरकोळ केरोसीन परवानेधारकांमार्फत गॅस जोडण्या नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचे वितरण केले जात होते. यासाठी त्यांच्याकडून हमीपत्र भरून याचा पुरवठा केला जात आहे. तर दुसरीकडे ज्यांच्या शिधापत्रिकेवर उज्ज्वला गॅस योजनेचा शिक्का आहे, अशा लाभार्थ्यांना केरोसीन दिले जात नाही.
...
चौकट
केरोसीनही बंद केले
चिपळूण तालुक्याला दर महिन्याला ८० हजार लिटर इतक्या केरोसीनचा पुरवठा जात होता, परंतु केरोसीनच्या किमतीत वाढ झाली आहे. सध्या ९५ रुपये प्रतिलिटर इतका केरोसीनचा भाव आहे. मात्र, आता केरोसीनही बंद केले आहे.
--------------
चौकट
ही तर फसवणूक
शासनाने गाजावाजा करून उज्ज्वला योजना सुरू केली. घराघरांत स्वयंपाकाचा गॅस पोहोचविण्यात आला, परंतु गॅस देताना केरोसीन मिळणार नाही याची तजवीज करून ठेवली. त्यामुळे गॅस घेऊन आम्ही फसलो. आता घरात गॅस असल्याने केरोसीनदेखील दिले जात नाही. शासनाने आमची फसवणूक केली, अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागातील नागरिकांनी दिली आहे.
-------------
कोट
केरोसीन घेणाऱ्या लाभार्थीची मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे. रेशन दुकानावर केरोसीन येते कधी आणि संपते कधी, याची काहीच माहिती मिळत नाही. पुरवठादाराला विचारल्यांनतर त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे केरोसीन मिळणे बंदच झाले आहे.
-दीपक कदम, पेढांबे
..
एक नजर...
तालुक्याला दर महिन्याला केरोसीनचा पुरवठाः ८० हजार लिटर
केरोसीनचा भावः ९५ रुपये प्रतिलिटर
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82595 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..